विषय «विषमता»

सांस्कृतिक गंड आणि गंडांतर

दोन जूनच्या द इंडियन एक्स्प्रेसमध्ये एक वृत्त प्रकाशित झाले होते. त्यात काही दिवसांपूर्वी टेनिस स्पर्धेत भाग घेण्यासाठी जाताना अपघातात मृत्यू पावलेल्या १८ वर्षीय विश्व दीनदयालम या होतकरू क्रीडापटूंच्या वडिलांची कैफियत मांडण्यात आली होती. त्यांचे असे म्हणणे होते की, भारतीय क्रीडा प्राधिकरण या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्थेने विश्वच्या आयुर्विमासंदर्भात त्यांच्या त्याआधी तीन आठवड्यांपुर्वी पाठवलेल्या पत्राला साधे उत्तरही दिले नाही.

हे वाचून मला २००९ मधील माझ्या एका पत्रव्यवहाराची आठवण झाली. तेव्हा मी द इंडियन एक्स्प्रेसचा पत्रकार म्हणून कृषीविषयक एका वृतांकनासाठी अमेरिकेला गेलो होतो.

पुढे वाचा

जग कुठे आणि भारत कुठे…

असं म्हटलं जातं, जगभरामध्ये सर्वांत शक्तिशाली देशांपैकी भारत हा तिसरा सगळ्यांत मोठा देश आहे. पण खरं वास्तव काय आहे आपल्या देशाचं? या देशातल्या शेवटच्या घटकांत राहणाऱ्या माणसांमधले भय अजूनही संपलेले नाही. इतिहासातल्या घटनांना वर आणून त्याला पुष्टी व पाठबळ देण्याचं काम आपल्या देशातली व्यवस्था सध्या करत आहे. त्यामध्ये सगळ्यात मोठं भय म्हणजे अंतर्गत सामाजिक सुरक्षेचं. या देशातले अल्पसंख्याक, इथले भटकन्ती करणारे आदिवासी माणसं सध्या सुरक्षित नाहीत. या बांधवांवर कुठेही झुंडीने हल्ले होतात. अश्या घटनांमुळे भारत सध्या जगामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

पुढे वाचा

महिला नाहीत अबला… पण केव्हा?

Image by Wokandapix from Pixabay
Image by Wokandapix from Pixabay

निसर्गात कोणतीही गोष्ट साचून राहिली की दूषित होते. प्रवाहीपणा व बदल हा निसर्गाचा नियम आहे. पण आपली जातिसंस्था, कुटुंबसंस्था, विवाहसंस्था, समाजातील रूढी-परंपरा गतकालानुगतिक जशाच्या तशा आहेत व आतल्या आत सडत आहेत. काळ बदलला तसे संदर्भही बदलले. तेव्हा या सर्व संस्थांमध्ये, रूढी-परंपरांमध्ये बदल करून त्यांना बदलत्या समाजरचनेप्रमाणे सुटसुटीत, प्रवाहित व काळानुरूप करण्याची गरज आहे. म्हणूनच पुरुषी वर्चस्व झुगारण्याची सुरुवात कुटुंबातील स्त्रियांनाच करावी लागेल. वैचारिक दुर्बलता मागे टाकून प्रगतीची उत्तुंग झेप सर्वसामान्यांनी घेण्यासाठी योनिशुचितेचे अवडंबर दूर करून नैसर्गिकतेने जगणे आवश्यक आहे.

पुढे वाचा

बहुमूल्यी विश्व

“इंडिया विरुद्ध भारत हा झगडा नवा नाही. कित्येक वर्षांपासून तो सुरू आहे. शहरी विरुद्ध ग्रामीण, आहे-रे विरुद्ध नाही-रे, संधी असणारे विरुद्ध संधी नसणारे, उच्चवर्गीय/वर्णीय विरुद्ध इतर असा सगळा हा झगडा आहे. वेगवेगळ्या जाती, समूह, त्यांचे प्रयोजन, त्यांचे परस्परसंबंध, त्यांची गरज, त्यांतील तरल किंवा स्पष्ट भेद या सगळ्यांविषयी आपल्याला बोलावे लागणार आहे.”
‘आजचा सुधारक’च्या अंकाची ही थीम हातात पडली त्यावेळी नुकतेच २०२१ चे अ.भा.मराठी साहित्यसंमेलनाचे सूप वाजले होते नि त्यामुळे अध्यक्षीय भाषणाचा हॅंगओव्हर होता. म्हटलं, त्यावर लिहू का? आणि संपादकांनी “हो, तोही महत्त्वाचा विषय आहेच” असा प्रतिसाद दिला. मात्र लिहायला घेतल्यावर अंकाची थीम डोक्यात घोळायला लागली नि मनातल्या त्या विचाराची हीच बाजू जास्त प्रकर्षाने दिसायला लागली. अर्थात

पुढे वाचा

गांधीजींची जमीन, बाबासाहेबांचा किल्ला!

भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठेपणा याबद्दल वाद असण्याचं कारण नाही. बाबासाहेब आणि गांधीजी यांच्यात काही मतभेद जरूर होते. मात्र त्यामागे त्यांचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नव्हता. देशाचं आणि समाजाचं कल्याण हाच दोघांचाही ध्यास होता! दोघांनाही एकमेकांच्या असण्याची किंमत आणि महत्त्व माहीत होतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी दोघांनाही दोन पावलं मागं यावं लागलं असेल, तर ते त्यांनी मान्य केलं. पुणेकरार हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. दोघंही आपापल्या ठिकाणी बरोबर होते.

पुढे वाचा

जीवनव्यवहारातील स्त्रीवाद

आजकाल आपले आयुष्य इतके समस्याप्रधान झालेले आहे व कितीतरी प्रश्न आपल्यासमोर ‘आ’ वासून उभे आहेत. त्यातलाच एक फार गंभीर प्रश्न म्हणजे ‘लैंगिक विषमता’. ह्या प्रश्नावरचा अगदी रामबाण उपाय म्हणजे सर्वांनी आपल्या जीवनव्यवहारात स्त्रीवादाचा अवलंब करणे.

कोणतीही विचारसरणी अंगीकारायची झाल्यास आपल्याला त्या विचारसरणीच्या अगदी मुळापर्यंत जावे लागते. म्हणजेच ‘काय’, ‘का’ आणि ‘कसे’ ह्या तीन प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधावी लागतात. तेव्हाच आपण त्या विचारसरणीचा अवलंब करू शकतो. स्त्रीवादाच्या मुळापर्यंत जाण्यासाठीदेखील तीन प्रश्नांची उत्तरे सर्वात आधी आपल्याला शोधावी लागतात.

पुढे वाचा

इंडिया विरुद्ध भारत

डिसेंबर १९७७ मध्ये जी.आर.भटकळ स्मृती व्याख्यानमालेत ‘भारतीय समाजातील वर्ग संघर्षाचे स्वरूप’ या विषयावर प्राध्यापक वि.म.दांडेकर यांनी आपले विचार मांडले. त्यांच्या या भाषणाची पार्श्वभूमी जाणून घेणे गरजेचे आहे. १९७५ साली जून महिन्यात श्रीमती इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जारी करून देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि कामगारांच्या पुढाऱ्यांना तुरुंगात डांबले. यामुळे स्वाभाविकपणे लोकांचे व खास करून कामगारांचे लढे थंडावले. त्यामुळे आणीबाणी संपून विरोधी पक्षाचे नेते व कामगाराचे पुढारी मुक्त होताच देशात अस्वस्थ लोक आणि कामगार यांचे लढे सुरू झाले. याच काळात डॉक्टर दत्ता सामंत याचे लढाऊ नेतृत्व मुंबई व ठाणे परिसरच नव्हे तर थेट औरंगाबादपर्यंत बंडाचे निशाण फडकावू लागले. याच

पुढे वाचा

तीन कविता

१. तुला डॉलच बनून रहायचे असेल तर 

तुला डॉलच बनून रहायचे असेल तर 
पाठवत राहा शुभेच्छा 
महिला दिनाच्या.. 
बस कुरवाळत 
तुझ्या सहनशीलतेच्या दागिन्याला 

तसेच, आयुष्यभर पुन्हा 
सहन करण्यासाठी… 
करत रहा अभिमान 
तुझ्या स्वत्वाच्या त्यागाचा 

दिवसाढवळ्या पाहिलेल्या स्वप्नाला
गुलाबी रंगाचा डोहात 
बुडवून मारण्यासाठी …
भरत रहा ऊर 

‘कशी तारेवरची कसरत करते’ 
हे ऐकून 
तुझ्या मनावर कोरलेल्या 
भूमिकेला न्याय देत 
घराचा ‘तोल’ तुझ्या मूकपणाच्या 
पायावर सांभाळण्यासाठी… 
टाकत राहा 
मनगटात बांगड्यांचे थर

नेसत राहा 
नवरात्रीच्या नऊ साड्या 
करत रहा 
मेंदूला गहाण ठेवणारे उपवास 
भरत रहा 
टिकल्यांचा ठिपका 
तुझ्या प्रशस्त कपाळाच्या  
स्वातंत्र्याच्या चंद्रावर 
ग्रहणासारखा

तुला डॉलच बनून राहायचे असेल तर….

पुढे वाचा

इंडियन ॠतू

अनाहूत आलेल्या वादळाने
उडवून नेलीत काही पत्रे,
तुटून पडले काही पंख..!

सोबतीने आलेला मित्र
शांत थोडीच राहणार…!

जीव तोडून बँकेचे हप्ते भरले जात होते..
समतल केलेल्या जमिनीला बांधलेले बांध मात्र साथ सोडून पळाले
अन् वावरेच धो – धो वाहू लागली!

तुटलेल्या छपराला
चिकटलेले आहेत
फक्त काही कोरडे अश्रू!

एक बैल डोंगर पायथ्याशी मरून पडलाय..
एकमेव दागिना मोडून
गुलाल उधळत आणला होता..
तशा.. बांगड्या बाकी होत्या!

वावरातील पिकांचा
उडालेला हिरवा रंग,
आणि निस्तेज पडलेले
वखर आणि पांभर..
टक लावून बघतायेत
आकाशाकडे..

भुरकट पडलेल्या पिकांना
कोपर्‍यात पडलेल्या औषधांची आता गरज नव्हती…
मरून पडलेल्या बैलाच्या मागे राहिलेल्या दोराला मात्र
हवा होता एक नवा गळा!

पुढे वाचा

तुम्ही कुठल्या इंडियातले?

वीर दास ह्या विनोदी अभिनेत्याने “I come from two Indias” नावाचे कवितावजा स्फुट अमेरिकेतील वॉशिंग्टन डी सी येथील केनेडी सेंटरमध्ये नोव्हेंबरमध्ये सादर केले व त्याची दृकश्राव्य फीत समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केली. ह्या घटनेने एकच हलकल्लोळ उडाला. त्यानं सादर केलं आहे त्यावर “कसला भारी बोलला हा” इथपासून ते “कोण हा टिकोजीराव? ह्याला कुठे काय बोलावे याची काही अक्कल तरी आहे का?” इथपर्यंत सर्व तऱ्हेच्या प्रतिक्रिया आल्या. ध्रुवीकरण झालेल्या आपल्या देशात आजकाल कुठल्याही लोकप्रिय नेत्याच्या विरोधात काही बोलणे म्हणजे देशद्रोह आणि त्या सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करणे ही देशप्रेमाची व्याख्या होऊ लागली आहे. त्यामुळे अशा टोकाच्या प्रतिक्रिया येणे अभिप्रेतच होते. अर्थातच

पुढे वाचा