स. ह. देशपांडे यांचे ‘परंपरा, आधुनिकता आणि राष्ट्रवाद’ या विषयावरील दोन लेख आणि त्यावरील प्रा. अशोक चौसाळकर यांची ‘डॉ.स. ह. देशपांड्यांचा राष्ट्रवाद’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेली प्रतिक्रिया वाचली. राष्ट्रवाद म्हटले की काही आक्षेपांचा पाढा वाचायचा असा एक प्रघातच पडला आहे. ही प्रतिक्रिया नेमकी त्याच स्वरूपाची आहे, म्हणून मला या विषयासंदर्भात जाणविणार्याा काही बाबी येथे नोंदवीत आहे.
राष्ट्रवाद ही प्रामुख्याने गेल्या तीन शतकांमध्ये उदयास आलेली अतिशय प्रभावी वगतिमान विचारसरणी आहे. आनुवंशिक तत्त्वाने चालत आलेल्या राजघराण्यांना किंवा दैवी आधार असल्याचा दावा करणा-यांना या तत्त्वज्ञानाने झुगारून दिले.
विषय «इतर»
सार्वजनिक स्वच्छता
आगरकरांनी स्नान, पोषाख इत्यादींवर लिहिल्याचे त्यांच्या साहित्यांतून आढळते. परंतु, सार्वजनिक स्वच्छतेवर लिहिल्याचे आढळले नाही. कदाचित् त्यांच्या काळी या विषयावर लिहिण्याची त्यांना आवश्यकता वाटली नसावी.
सांप्रत सार्वजनिक स्वच्छतेची स्थिती इतकी चिंताजनक झाली आहे की, त्यावर न बोललेलेच बरे. सार्वजनिक स्वच्छतेबाबत आपल्याला इतकी अनास्था आहे की आपण गेंड्याच्या कातडीचे झालो आहोत. सुरत शहरात प्लेगसारख्या महामारीचा उद्भव झाल्यावर सुद्धा आपल्यावर कसलाही परिणाम झाला नाही. साठलेला कचरा, घाण, दुर्गंधी यामुळे प्लेगचा उद्भव होतो हे कारण समजल्यानंतर, सुरतमध्ये आणि देशातील अन्य शहरांमधे नगरपालिका, महापालिका, यांनी चार दिवस सफाई मोहीम राबविली, शासकीय फतवे निघाले, लोकांनी नाकातोंडाला फडकी बांधून रस्त्याने जाणे सुरू केले आणि कुठे एखादा मेलेला उंदीर सापडला तर तो परीक्षणासाठी कुठल्यातरी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला.
मुक्यांचा आक्रोश
शिक्षणाचे लोण पसरत आहे. त्याबद्दल विस्तार झाला, पण उथळपणा आला अशी तक्रारही आहे. तिच्यात तथ्यांश असेल, पण विस्ताराचे अनेक फायदेही आहे. उदा. दलित साहित्य, ते नसते तर समाजाचे केवढाले गट केवढी मोठी दु:खे मुक्याने गिळीत होते हे कळलेच नसते. मूकनायक निघायला शतकानुशतके लोटावी लागली.
भीमराव गस्ती यांचे बेरड हे आत्मकथन १९८७ साली प्रकाशित झाले तेव्हा दलित आत्मकथांची पहिली लाट ओसरत चालली होती; म्हणून आपल्या कहाणीकडे लोकांचे लक्ष जाईल की नाही याची शंका लेखकाला होती. पण वाचकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
‘सुखाची जात सर्वत्र एकच पण दुःखाच्या जाती अनंत हेच खरे’!
आम्ही कां लिहितों?
ज्या प्रौढ लोकांच्या मनांत विशिष्ट धर्मकल्पना कायम होऊन गेल्या आहेत व ज्यांचे वर्तन तदनुरोधाने होत आहे त्यांच्या मनावर असल्या चर्चेचा विशेष परिणाम होण्याचा संभव नाहीं हे खरे आहे. पण आमचे असले निबंध तसल्या लोकांकरितां लिहिलेलेच नसतात. ज्या तरुण वाचकांच्या धर्मकल्पना दृढ झाल्या नसतील; ज्यांच्या बुद्धींत साधकबाधक प्रमाणांचा प्रवेश होऊन त्यांचा विचार होणे शक्य असेल; व विचारा अंतीं जें बरें दिसेल त्याप्रमाणे आम्ही थोडा-बहुत तरी विचार करू अशी ज्यांना उमेद असेल, त्यांच्याकरितांच हे लेख आहेत. असले लेख एकदा लिहून टाकले म्हणजे आपले कर्तव्य आटपलें असें कदाचित् मोठमोठ्या तत्त्वशोधकांस म्हणता येईल….पण
श्री. गोखल्यांचे ईश्वरास्तित्वाचे समर्थन
प्रा. विवेक गोखले आपल्या ‘आस्तिक्य आणि विवेकवाद’ (आ.सु. ८.७, पृ. २१२) या लेखात म्हणतात की नास्तिकांचा एक युक्तिवाद बिनतोड समजला जातो. पण तसा तो नाही. आणि त्यानुसार त्यांनी त्या युक्तिवादाचे एक खंडन सादर केले आहे.
नास्तिकांचा युक्तिवाद असा आहे : ईश्वरवाद्यांच्या ईश्वरस्वरूपाविषयी अनेक कल्पना आहेत. त्यापैकी ईश्वर सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वथासाधु आहे ही एक आहे. पण असा ईश्वर असू शकत नाही, कारण जगात निर्विवादपणे अस्तित्वात असलेले प्रचंड दुःख आणि वरील वर्णनाचा ईश्वर यांत विरोध आहे. ईश्वर जर ईश्वरवादी म्हणतात तसा असता, तर जगात दुःख असू शकले नसते, कारण ते त्याच्या साधुत्वाला बाधक झाले असते.
विज्ञानातील व्याधी (Diseases in Science) -प्रा. जॉन एकल्स यांचे काही विचार
. इतकेच नव्हे तर या व्याधींवर करण्याचे उपाय हे कार्ल पॉपर यांच्याच लेखनात व विचारांत मिळू शकतात हे एकल्स यांनी स्पष्ट केले आहे. विज्ञानक्षेत्रातील व्याधींबद्दल प्रा. एकल्स यांचे विचार वाचकांसमोर मांडावे असे वाटल्यावरून हे टिपण लिहिण्यास घेतले.
सुरुवातीलाच प्रा. एकल्स यांनी प्रांजळपणे कबूल केले आहे, की त्यांना हे विचार ते स्वतः संशोधनकार्यातून निवृत्त झाल्यावर, मागील आयुष्यक्रमावर दृष्टिक्षेप करताना सुचले. ते स्वतः संशोधनात गुंतले असताना त्यांच्यातही या व्याधी व हे दोष अंशतः होतेच. विज्ञानांतील संशोधनकार्य ज्या रीतीने चालविले जाते, ज्या संस्थांचा या कार्याला पाठिंबा आहे, त्यांना विज्ञान तंत्रज्ञान यांतील प्रगतीमुळे काय अपेक्षित आहे, अशा तर्हेाच्या प्रश्नांशी त्यांनी निर्देश केलेल्या व्याधी व दोष निगडित आहेत.
विक्रम, वेताळ आणि अप्रिय उत्तरे
राजा, आता तू मला गोंधळवण्यात पटाईत व्हायला लागला आहेस. पण अजून या ‘असली घी’ खाल्लेल्या ‘पुरान्या हड्डीत’ तुला बांधून ठेवण्याइतकी अक्कल आहे!” वेताळ म्हणाला. राजा मिशीतल्या मिशीत हसत वाट चालत राहिला.
‘राजा, माझ्या घराजवळ एक बंगला आहे. त्याच्या आवारात नोकरांसाठी काही खोल्या बांधलेल्या आहेत. बंगल्यात एक सुखवस्तू, सुस्वभावी कुटुंब गेली तीसेक वर्षे राहात आहे. ते बंगल्यात आले तेव्हा त्यांनी एक महादेव नावाचा नोकर ठेवला. अशिक्षित, पण कामसू. मुळात महादेव एकटाच होता, पण यथावकाश त्याने पार्वती नावाच्या बाईशी लग्न केले. साताठ वर्षांत त्यांना मुलगा, मुलगी, मुलगा, मुलगी अशा क्रमाने चार मुले झाली.
विश्वातील सर्वव्यापी मूलतत्त्व
डॉ. हेमंत आडारकरांनी माझ्या पत्राची (आ.सु. ८:४, १११-११२) दखल घेतल्याबद्दल त्यांचे आभार. विश्वाच्या उत्पत्तीत व संरचनेमध्ये कोणा सूत्रधाराचा हात आहे असे डॉ. आडारकरांना जाणवते (आ.सु. ८:२, ५९-६१) या त्यांच्या जाहीर विधानावर आमचा तीव्र आक्षेप आहे. एखादा डॉक्टर, पोलीस अधिकारी, कवी, वकील यांच्यासारखाच शास्त्रज्ञ आस्तिक/नास्तिक असू शकतो ( आ.सु. ८.५, १५२-१५३) हे आडारकरांचे म्हणणे ही शोचनीय गोष्ट आहे. भारतातील एका नामवंत विज्ञानसंस्थेशी संबंध असलेल्या डॉक्टरआडारकरांसारख्या वैज्ञानिकाने अशी अवैज्ञानिक विधाने सार्वजनिकपणे करावीत हे भारतीय विज्ञानाच्या प्रगतीसाठी अयोग्य आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे.
उदारीकृत जागतिक अर्थव्यवस्थेच्या पूर्वसंध्येतील भारत
भारतीय अर्थव्यवस्थेचे जसजसे उदारीकरण आणि जागतिकीकरण होईल, तसतसे आपल्याला राष्ट्र म्हणून खुल्या, स्पर्धात्मक जागतिक बाजारपेठेचे धक्के-झटके सहन करावे लागतील. स्वातंत्र्यानंतर आपल्या उद्योगधंद्यांना संरक्षण दिले गेले, ज्यामुळे कमी गुणवत्तेचा माल प्रचलित होत राहिला. जसे, अनेक वर्षे नवे ‘मॉडेल’ न काढलेली हिंदस्तान मोटर्सची अॅम्बॅसेडर कार, “आपण जे काही बनवू ते खपतेच’ या भारतीय उद्योजकांच्या भावनेतून जागतिक बाजारपेठांमध्ये गुणवत्तेत किंवा किंमतीतही न टिकू शकणारी उत्पादने आज आपल्या येथे दिसतात. आता आपल्याला विकसित देशांचे तंत्रज्ञान व भांडवल मिळवणे गरजेचे वाटू लागले आहे. हे तंत्रज्ञान आणि भांडवल ज्या किंमतीत मिळेल, ती किंमतही जागतिक बाजारपेठेतच ठरेल, कारण इतरही विकसनशील देशांना याच सेवांची गरज आहे.
आस्तिक्य आणि विवेकवाद
विवेकवाद म्हणजे अनुभव आणि तर्क यांच्याशी सुसंगत असेल तेवढेच स्वीकारणे आणि यांच्याशी विसंगत असणारे काहीही न स्वीकारणे.
ईश्वरविरोधी, विवेकवादी नास्तिकांची भूमिका अमान्य करता आली तर आपोआपच आस्तिकवादाची तर्कसुसंगतता सिद्ध होईल. आपण विवेकवादी नास्तिकांचा ईश्वरविरोधात युक्तिवाद पाहू. हा युक्तिवाद त्यांना बिनतोड वाटतो.
विवेकवादी नास्तिकांचा ईश्वरविरोधातील युक्तिवाद
नास्तिकांचा युक्तिवाद मुख्यतः आस्तिकांच्या भूमिकेतील विसंगतीवर बोट ठेवणारा आहे. त्यांचे म्हणणे असे की आस्तिकांची ईश्वरविषयक कल्पना ही मुख्यतः दुःखहर्या ईश्वराची आहे. जगातील विविध प्रकारचे आणि अपार असे दुःख पाहिले तर त्यापासून मुक्तता द्यायला समर्थ असा फक्त ईश्वरच असू शकतो अशी आस्तिकांची समजूत आढळते.