लोकांनी नैसर्गिक पाण्याच्या स्रोतात गणेशविसर्जन न करता त्या मूर्ती लाक्षणिक विसर्जन करून दान द्याव्यात हा या चळवळीचा मुख्य उद्देश आहे. या दान दिलेल्या मूर्तीचे निर्गत मग अन्य ठिकाणी पर्यावरणाला विशेष हानी न पोचविता केले जाते. पूर्णतः धार्मिक अंगाने विचार केला तर गणपतिविसर्जन हा भाग परंपरेचा अधिक आहे. प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी व सांगता पूजा केल्यानंतर गणपतीच्या मूर्तीत देवत्व नसते. त्यामुळे या आंदोलनाने धार्मिक बाबींमध्ये ढवळाढवळ होत नाही. याउलट लोकसंख्यावाढीमुळे, मूर्तीचे आकारमान वाढल्याने, त्यांच्या बनविण्याच्या पद्धतीत व साधनात बदल झाल्याने आणि नैसर्गिक जलस्रोतांची हानी झाल्याने पारंपारिक गणेशविसर्जन बदलले आहे.
परिसंवाद
(चार विचारवंतापुढे पाच प्रश्न मांडले गेले. मांडणी जराजराशी वेगळी असूनही मतांचा गाभा मात्र समान असल्याचे दिसते.) प्रश्न १: भारतीय मध्यमवर्ग कोणत्या अर्थी इतर देशांमधील मध्यमवर्गापेक्षा वेगळा आहे ? आदित्य निगम: आर्थिकदृष्ट्या उपभोक्ता वर्ग सगळीकडे सारखाच असतो. राजकीय-सामाजिक चित्र मात्र (भारतात) गुंतागुंतीचे आहे. दलित, मुस्लिम, हिंदू असे राजकीय आशाआकांक्षांमुळे वेगवेगळे गट पडले आहेत पण ते वेगाने ‘वैश्विक’ होत आहेत. नेहरूयुगात अभिजनवर्ग इंग्रजी जाणणाराच असे. आज भाषिक, प्रांतिक इत्यादी गट विकसित होऊन काँग्रेसचे पतन झाले आहे, आणि प्रांतिक पक्ष वाढले आहेत. अशा परिस्थितीत एकच एक मध्यमवर्ग मानणे भ्रामक ठरेल.
आठवणीची आठवण
जगात गरीब असतात, हे आपल्याला माहीत असतं. भारतासारख्या गरीब, शेतीप्रधान देशातले गरीब म्हणजे फारच गरीब असतील; आपल्याला कळतही असतं. पण त्यांच्या जगण्याकडे आपण कधी निरखून पाहात नाही. पर्यटनाच्या वा इतर निमित्ताने हिंडताना कधी असे गरीब लोक दिसले, तर आपण त्या दर्शनाचा क्षणभर चटका लावून घेतो आणि आपल्या मार्गाला लागतो. तळागाळातल्या लोकांची जाणीव आपल्यासाठी एक ‘घटना’ असते. त्या घटनेवर हळूहळू इतर घटनांचे ठसे उमटत जातात आणि गरिबीच्या दर्शनाचा ठसा पुसट होत जातो. त्याची आठवण तेवढी उरते. त्या आठवणीला जर आपण स्वतःला संवेदनाशील म्हणवून घेत असलो, तर आपण मनाच्या कोपऱ्यात नीट जपतो.
विवेकवाद – भाग 1
(प्रथम प्रकाशन एप्रिल 1990 अंक 1.1, लेखक – दि. य. देशपांडे)
विवेकवाद ही केवळ एक विचारसरणी नाही, ती एक जीवनपद्धतीही आहे. मनुष्याने आपले सर्व जीवन विवेकाने जगावे, विवेकाने त्याची सर्व अंगोपांगे नियंत्रित व्हावीत असे त्याचे प्रतिपादन आहे. विवेक म्हणजे विवेचक शक्ती किंवा भेद करण्याची शक्ती. सत्य आणि असत्य, चांगले आणि वाईट, न्याय आणि अन्याय इत्यादींचा भेद ओळखण्याची ती शक्ती आहे. विवेकाच्या व्यापाराची अनेक क्षेत्रे आहेत. त्यांपैकी तूर्त ज्ञानक्षेत्र आणि कार्यक्षेत्र या दोघांचाच उल्लेख केल्यास पुरे होईल. सत्य म्हणजे काय ? आणि सत्य ओळखायचे कसे ?
नद्या आणि माणसे
‘आजचा सुधारक च्या एप्रिल-04 च्या अंकातील ‘माहितीचे दुर्भिक्ष म्हणून विरोधाचा सुकाळ लेखावर प्रतिक्रिया म्हणून नव्हे, तर त्यात काही भर घालण्याच्या उद्देशाने हे लिहीत आहे. नद्या जोडणी महाप्रकल्पाविषयी जी काही माहिती सरकारने उपलब्ध करून दिली आहे, आणि एकंदरीतच भारतासह जगभरातील जल प्रकल्पांच्या इतिहासातून जी माहिती मिळते, ती एकत्रितपणे पाहिली तरी या महाप्रकल्पाला कडाडून विरोध करावा, किती केला तरीही थोडाच, असेच कुणाही सुबुद्ध नागरिकाला वाटेल. त्या दृष्टीने काही माहिती पुढे देत आहे; प्रमुख आधार मेधा पाटकरांनी संपादित केलेले “River linking: A Millennium Folly ?”
शुद्धलेखनांतील अराजक परिणाम आणि उपाय (पूर्वार्ध)
(१) मुद्रित मराठी भाषेमध्ये एकसारखेपणा राहिलेला नाहीं. संगणकाच्या साहाय्यानें मुद्रण पूर्वीपेक्षां सोपें झालें असलें तरी त्याच्या उपलब्धतेमुळे जे नवीन लोक मुद्रणक्षेत्रांत उतरले त्यांस लेखनाचे कांहीं नियम असतात, आणि ते नियम लिहितांना, किंवा मुद्रण करण्यासाठी संगणकावर अक्षरें जुळवितांना पाळावयाचे असतात हे माहीत नाहीं. परिणाम असा झाला आहे की वर्तमानपत्रांतून आणि मासिकांतूनच नाही तर पुस्तकांमधूनसुद्धां एकसारखें मराठी वाचायला मिळत नाहीं.
(२) साक्षरतेचें प्रमाण अगदी कमी होतें तेव्हा होणारे लेखनहि साहजिकच मोजकें होतें. विचारांचा किंवा माहितीचा हा ठेवा आपण पुढच्या पिढ्यांच्या स्वाधीन करीत आहोंत अश्या भावनेनें प्रारंभी लिहिलें जात असलें पाहिजे.
प्राथमिक शिक्षणात गणित विषयाचे अध्यापन आणि अध्ययन-एक चिंतन (भाग ५)
‘गणित एक भाषा‘ ह्याविषयी थोडेसे
गणिताने विकसित केलेल्या संबोधांचा सर्व विज्ञानात पदोपदी उपयोग होतो म्हणून गणित ही सर्व विज्ञानाची भाषा आहे असे म्हणतात. बोल भाषेतील विचारांना चिन्हांचा उपयोग करून जेव्हा लेखी स्वरूपात मांडले जाते तेव्हा त्याला गणिती भाषांचे स्वरूप प्राप्त होते. म्हणून ही गणिती भाषा वाचता येणे आणि समजणे ह्या क्षमतांना प्राथमिक शिक्षणात महत्त्वाचे स्थान देणे आवश्यक आहे असे वाटते. त्याचप्रमाणे चिन्हांचा उपयोग करून गणिती विचार लिहिता येणे यालाही महत्त्व देणे आवश्यक आहे. गणिती उदाहरणे सोडवता येण्यासाठी ह्या क्षमतांवर सातत्याने लक्ष दिले पाहिजे.
केशकर्तन, रंगमंच आणि पावित्र्य
महाराष्ट्र नाभिक महामंडळाने नाभिक समाजातील तरुण व्यावसायिकांना प्रशिक्षण मिळावे व रोजगार निर्माण व्हावा, या उद्देशाने सलून आणि ब्युटी पार्लरबाबत एक आधुनिक प्रशिक्षण शिबिर, पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये अलीकडेच आयोजित केले होते. त्या शिबिराच्या वेळी रंगमंचावर केस कापण्याचे प्रात्यक्षिक, अर्थातच, दाखविले गेले. त्यामुळे रंगदेवतेच्या पावित्र्याचा भंग झाल्याची तक्रार मराठी नाट्य व्यवस्थापक संघाने केली असून, यानंतर अशा प्रकारच्या कार्यक्रमांना रंगमंदिर उपलब्ध करून देऊ नये, अशी मागणीही केली आहे.
सर्वप्रथम हे मान्य केले पाहिजे, की नाट्य व्यवस्थापक संघाचा, रंगदेवतेच्या पावित्र्याचा मुद्दा संपूर्णतः गैरलागू आहे.
जालियांवाला बाग/अबु घरीब
13 एप्रिल 1919 ला घडलेल्या एका घटनेने भारतातल्या ब्रिटिश साम्राज्याचे भवितव्य ठरले. त्या घटनेमुळे स्वातंत्र्यचळवळीचे नेतृत्व गांधींकडे गेले. नेहरू पितापुत्रांनी याच घटनेमुळे इतर विचार सोडून देऊन संपूर्ण स्वराज्याचे उद्दिष्ट स्वीकारले.
दिवस बैसाखीचा, वसंतोत्सवाचा. अमृतसर शहरातील भिंतींनी वेढलेले, एकाच अरुंद बोळातून जा-ये करता येईलसे एक मैदान, नाव जालियांवाला बाग. ब्रिटिश साम्राज्याचा निषेध करणारी एक शांततामय सभा भरलेली. ब्रिगेडियर जनरल आर.ई.एच. डायरला ही सभा भरवणे हा ब्रिटिश साम्राज्याचा उपमर्द वाटला. त्याने आपल्या हाताखालच्या सैनिकांना सभेवर गोळीबार करायचे आदेश दिले..
सभा प्रक्षोभक नव्हती. ती बेकायदेशीर असल्याची घोषणा केली गेली नाही.
आधुनिकोत्तरवाद, हिंदू राष्ट्रवाद व वैदिक विज्ञान (१)
1996 साली ब्रिटनमधील विश्व हिंदू परिषदेने एक सचित्र व गुळगुळीत पुस्तक प्रकाशित केले. हिंदू धर्माचि स्पष्टीकरण शिक्षकांसाठी मार्गदर्शिका’ या नावाच्या या पुस्तकात ‘वर्गात हिंदू कल्पना व विषय शिकवण्याबाबतच्या सूचना’ आहेत. ब्रिटिश शालापद्धतीतील माध्यमिक व उच्च वर्गामध्ये वापरासाठी हे पुस्तक आहे. आज पुस्तक दुसऱ्या आवृत्तीत उपलब्ध आहे.
पुस्तक ब्रिटिश शिक्षकांना सांगते की हिंदू धर्म हे चिरंतन निसर्गनियमांचेच दुसरे नाव आहे.’ वैदिक ऋषींनी शोधून काढलेले आणि नंतर आधुनिक भौतिकशास्त्रज्ञांनी व जीवशास्त्र्यांनी पुष्टी दिलेले हे नियम आहेत, असा दावा आहे. यानंतर गणित, भौतिकी, खगोलशास्त्र, वैद्यक आणि उत्क्रांतीचे शास्त्र यांच्या वेदांमधील उल्लेखांचे ठार चुकीचे व आत्मतुष्ट ‘स्पष्टीकरण’ आहे.