एकोणिसाव्या शतकातील नव-हिंदुराष्ट्रवाद्यांनी अध्यात्मकेंद्री हिंदुत्वाच्या आधिभौतिक रूपावर आधुनिक विज्ञानाचा साज चढवायला सुरुवात केली. कर्मकांडे, निसर्गव्यवहार आणि मानवाची नियती यांच्यात साम्ये शोधण्याच्या प्राचीन पंडिती परंपरेचाच तो एक नवा अविष्कार होता. आजचे हिंदुत्वप्रचारक या लोकांचेच वारस आहेत.
आधुनिकोत्तरांचे मत असे विश्वाचे वास्तव रूप अनाकलनीय आहे. सर्वच समाज आपापल्या रचनेप्रमाणे विश्वाबाबतच्या ज्ञानाची पद्धतशीर ‘दर्शने’ उभारतात. सर्वच समाजांची दर्शने स्वेच्छ, रीलळीीरी असतात. त्यांच्यात सत्यासत्यतेवरून डावे उजवे करता येत नाही. त्यांची हवी तशी मिश्र रूपे घडवून वेगवेगळ्या समाजांना वेगवेगळी सांस्कृतिक विश्वे घडवता येतात. विश्वाबाबतच्या वेगवेगळ्या संकल्पनांमध्ये सारखेपणा शोधणे आधुनिकोत्तरांच्या ज्ञानशास्त्राला मान्य आहे.