काही वर्षांपूर्वीची गोष्ट. एका नामांकित भारतीय बुद्धिवादी महिलेशी माझी गाठ पडली. सहज संभाषण सुरू झाले. मी तिला सांगत होतो की मी हिंदी व इंग्रजीतूनही लिहितो. शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने हिंदी आवश्यक असल्याचे तिने मान्य केले. परंतु मी माझे काही लेख मुळातूनच हिंदीत लिहितो हे ऐकून मात्र तिला धक्का बसला. हिंदी वा तमिळसारख्या भाषा ह्या रस्त्यावरचे संभाषण करायला बऱ्या असतात. परंतु इंग्रजी किंवा फ्रेंचप्रमाणे त्यांच्यामध्ये संकल्पनांचा विचार करणे शक्य नाही असे तिचे म्हणणे होते.
हे संभाषण कायम माझ्या मनात रुतून बसले आहे. कारण आपण सर्वजण जे काही गृहीत धरतो, त्याचे ते निदर्शक आहे.