र. द. जोशी
आजचा सुधारकच्या ११.८ या अंकात श्री. पळशीकर यांचा जो लेख आहे त्याची एक चांगली प्रतिक्रिया, श्री. देशपांडे यांची त्याच अंकात आहे. मी थोड्या वेगळ्या अंगाने पुढील प्रतिक्रिया देऊ इच्छितो.
लेखाच्या पहिल्याच वाक्यात ‘धर्म या गोष्टीचा उदय झाला’ असे जे म्हटले आहे. ते योग्य नाही. उदय फक्त देव, दैवी शक्ती व श्रद्धा यांचा झाला.
भारतात धर्म या शब्दात कमीत कमी दोन तरी प्रमुख व वेगवेगळ्या संकल्पना अंतर्भूत मानायला हव्यात. एक म्हणजे देव, पितर, प्रत्यक्ष दिसणारी पंचमहाभूते यांना संतुष्ट करण्याच्या भ्रांत कल्पनांनी केली जाणारी, प्रार्थना, पूजा, व्रतवैकल्ये, होमहवन, यज्ञ इत्यादि आणि दुसरी म्हणजे विविध सामाजिक व्यवहार उदा.