ह. चिं. घोंगे - लेख सूची

पुस्तक परीक्षण: ‘विवेकीजनी ह्या मज जागवीलें’

प्रा. प्र.ब. कुळकर्णी यांचा नुकताच प्रकाशित झालेला हा लेखसंग्रह वाचनात आला. ह्यातील बरेचसे लेख यापूर्वी ‘आजचा सुधारक’ या मासिकातून अधूनमधून प्रसिद्ध झालेले आहेत. प्रस्तुत पुस्तकात ते एकत्र संग्रहीत झाले आहेत. माझे वाचन तसेही सीमित. विशेषतः धार्मिक ऐतिहासिक अशा विषयांशी संबंधित असणारे! त्यामुळे समाजसुधारणा, स्त्री-समस्या, सुधारकाचे चरित्रग्रंथ, तसेच मानवी भवितव्यतेवर भाष्य करणारे ग्रंथ ह्यांविषयी काहीशी अनास्थामूलक …

दहशतवादाची कथा: एक मूल्यांकन (लेखिका – ललिता गंडभीर, ग्रंथाली, मुंबई-२. प्रथमावृत्ती २००३ मूल्य रु.२५०/-)

अमेरिकेत स्थायिक झालेल्या, पॅथॉलॉजिस्ट असलेल्या, ललिता गंडभीर यांच्या चिंतनातून आणि इतिहासाच्या कालचक्रात निर्माण होणाऱ्या मानवाच्या प्रतिशोधात्मक प्रवृत्तीच्या अन्वेषणातून उत्क्रांत झालेली दहशतवादाची कथा ही कादंबरी, तीन वेगवेगळ्या दहशतवादी घटनांतील कथावस्तूच्या घट्ट विणीतून निर्माण झालेली, एका शांतपणे जळणाऱ्या ज्योतीने शेवटी विझून जावे तशी शोकांतिका आहे. कादंबरीचा कालखंड चाळीस वर्षांचा असून कादंबरीचे लेखन पूर्ण होण्यासाठी पंधरा वर्षांचा दीर्घ …

‘अक्षरधन’: विद्यादात्यांची अभिनव संस्मरणे

अक्षरधन हे प्रा. प्र. ब. कुळकर्णी यांच्या वठलेल्या आणि अनुभवसिद्ध लेखन-शैलीतून साकार झालेले पुस्तक. पूर्वी त्यांचे लेखन आजचा सुधारक आणि वृत्तपत्रे यांमधून नियमित प्रकाशित होत असे. माझ्या माहितीप्रमाणे पुस्तकरूपाने आलेले अक्षरधन हे त्यांचे पहिले प्रकाशन. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात प्रा. कुळकर्णी ह्यांचा लौकिक बराच झाला असला तरी साहित्यिक म्हणावे इतकी ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर नाही. आपल्या अविस्मरणीय शिक्षकांना …

सखी-बंधन

माणसात नर मादीचे नवे नाते अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे नाते सखीबंधनातून जडते. सखी-बंधन ही संकल्पना माझी नाही. नाशकाला आजचा सुधारक ह्या मासिकाच्या वाचकवर्गाचा नुकताच मेळावा भरविण्यात आला. लोकेश शेवडे, सुरेंद्र देशपांडे ह्या नाशिककरांनी तो आयोजित केला होता. या मासिकात स्त्रीपुरुषांचे विवाहनिरपेक्ष संबंध स्ढ व्हावेत या निसर्गसमीपतेचा पुरस्कार करणाऱ्या र. धों. कर्व्यांचे लेख …

एक लक्षवेधी संपादकीय

मार्च २००० चा आजचा सुधारक वाचला. प्र. ब. कुळकर्णी यांच्या चिंतनातून उतरलेले संपादकीय मननीय आणि विचारप्रवर्तक आहे. आतापर्यंत आ. सु. तील विवेकवादी विचारांचा मार्ग धुक्यात हरविल्यासारखा मला अस्पष्ट होता. प्र. व. ह्यांच्या संपादकीयातून विवेकवादी विचारसरणीला जे अपेक्षित आहे ते सुस्पष्ट झाले आहे. आजच्या सुधारकाने जी वैचारिक भूमिका घेतली आहे ती कर्मठांना आणि परंपरावाद्यांना मस्तकशूळ उत्पन्न …

गोमांसभक्षण: एक ऐतिहासिक वास्तविकता

डिसेंबर १९९९ आ. सु.च्या अंकात मित्रवर्य डॉ. भाऊ लोखंडे यांचा ब्राह्मणांचे गोमांसभक्षण या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेला लेख वाचला. लेखावरील प्रतिक्रिया वाचनात आल्या. लेखकाच्या हेतूविषयी त्यांत चर्चा आहे. पण ऋग्वेदकाली ब्राह्मण गोमांस खात नसत असे विधान या प्रतिक्रियावाद्यांनी केलेले नाही. याचा अर्थ असा की भाऊंचा पूर्वपक्ष त्यांना मान्य असावा. उत्तरपक्ष करण्यासाठी त्यांनी ऋग्वेदाचे सांस्कृतिक अध्ययन केले …

प्रचंड गोंधळ भाट्यांचाच

जुलै १९९९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आ. सु. च्या अंकात अमेरिकानिवासी श्री. अनिलकुमार भाटे नावाच्या एका वाचकाची प्रतिक्रिया वाचनात आली. प्रा. देशपांडे ह्यांनी आपल्या लेखातून आत्मा, पुनर्जन्म, कर्मसिद्धान्त अशा भारतीय आस्तिक दर्शनशास्त्रातील संकल्पनांचे खंडन केले आहे. त्या संकल्पनांचे मंडन करण्यासाठी भाटे ह्यांनी जो काय तर्कशास्त्राचा अभ्यास केला असेल किंवा हेगेल, हुसेर्ल, हायडेगर. या हकाराच्या वाराखडीतील युरोपी …

लोकेश शेवडे यांच्या पत्राला उत्तर

आजच्या सुधारकातील हुसेन साहेबांच्या चित्राविषयीच्या लेखासंबंधी प्रतिक्रिया व्यक्त करणारे लोकेश शेवडे यांचे पत्र एप्रिल १९९७ च्या अंकात प्रसिद्ध झालेले आहे. पत्रातील आमच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा मुद्दा म्हणजे लेखनशैली. स्वभावाने आम्ही उद्दाम किंवा बेरड नसून खिलाडी वृत्तीने टीकाकाराचेही महत्त्व मान्य करण्याची आमची वृत्ती आहे. प्रा. के. रा. जोशी यांनीआमच्या विचारांसंबंधी वेळोवेळी उपहास केला आहे. त्यांचा तो …

हुसेनसाहेबांचे अश्लील चित्र

सुप्रसिद्ध चित्रकार हुसेन साहेब ह्यांनी आपल्या धर्मातील देवदेवतांची विटंबना करणारे अश्लील चित्र रंगविले आहे. त्या चित्राची अस्पष्ट प्रतिमा ‘इंडियन एक्सप्रेस’च्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेली आहे. ती कृष्ण धवल आहे. त्यातून रंग संगती, रंगाचा तरलपणा, सुस्पष्ट होत नाही. चित्र परंपरावादी शैलीचे (क्लासिकल) नसून नूतन चित्रकलेचा नमुना आहे. या चित्रात गणपती वाटावा अशी आकृती आहे. शंकराचे नुसते …

हिंदुत्व -प्रा. आचार्यांच्या प्रश्नांना उत्तरे

‘हिंदुत्व एक अन्वेषण’ या लेखासंबंधी आजच्या सुधारकात, प्रश्न करणाच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रा. आचार्यांनी ऐतिहासिक विधानांच्या सत्यासत्यतेसंबंधी प्रश्न उपस्थित केले आहेत. श्री. रिसबुडांनी या विषयाच्या अनुषंगाने आपली वैचारिक प्रतिक्रिया मांडलेली आहे. या दोन्ही विचारवंतांच्या प्रतिक्रिया मननीय आहेत. हिंदुत्वासंबंधी आमच्या विधानांना या विद्वानांचा फारसा आक्षेप असलेला दिसत नाही. तरीपण या विचारवंतांनी लेखनातील ज्या नेमक्या त्रुटी …

मिथ्ये आणि वास्तव

(१) ज्ञानदेव – ‘म्हैशा मुखीं वेद बोलविले’ जगातील पुराणकथातील, संतचरित्रातील कथानायकांच्या जीवनात अलौकिक वाटणाच्या घटनांची रेलचेल असते. मानवी स्वरूपातील व्यक्ती अतिमानवी स्वरूपात प्रक्षेपित केल्या जातात. काही कथानायक निसर्गशक्तींच्या मानवीकरणातून (athropomorphism) जन्माला आले असतात. त्यांच्या जीवनातील अलौकिकत्व नैसर्गिक शक्तीचे कार्य म्हणून स्पष्ट करता येते. जसे ‘अग्नी हा देवांचा पुरोहित आहे असे ज्यावेळी सांगितले जाते त्यावेळी अग्नीतून …

हिन्दुत्व-अन्वेषण (उत्तरार्ध)

आजचा सुधारक मासिकाच्या ऑक्टो. ९५ च्या अंकातील लेखातून हिंदुत्व या धार्मिक संज्ञेचा ऐतिहासिक शोध निष्फळ ठरतो याविषयीचा विचार मांडला आहे. राजकीय स्वार्थासाठी हिन्दुत्वाचा जयकार केला जात असेल तर प्रस्तुत लेखकाला या । विषयाची चर्चा करण्याची गरज नाही. पण ज्यावेळी जनजागृतीसाठी धर्मप्रचाराचा अभिनिवेश असतो त्यावेळी असे जाणवते की प्रचाराची माध्यमे ज्यांच्याजवळ आहेत ते कर्मठ आहेत, आणि …

हिन्दुत्व-अन्वेषण (पूर्वार्ध)

या लेखाचे प्रयोजन आहे काय? जनमानसात ज्या धार्मिक कल्पना रुजल्या आहेत त्यांना छेद देण्याची आवश्यकता काय? वर्तमान काळात हिन्दुत्व आणि राजकीय आकांक्षा याचे अतूट नाते जुळलेले आहे, आणि आजच्या सुधारक या मासिकाचा वाचक-लेखकवर्ग विचक्षण, प्रज्ञावंत, विवेकवादी, आणि सत्यान्वेषी आहे. ईश्वराचे अस्तित्व, ‘भारतीय समाजातील स्त्रीची भूमिका अशा विषयासंबंधी जनमानसात रूढ असणाच्या संकल्पनांना छेद देणारे लेख या …

शारदेचा पुनर्जन्म

माझे परम मित्र प्रा. कुळकर्णी यांचा पुनर्जन्मासंबंधी शोध घेणारा एक प्रश्नांकित लेख वाचला. (आजचा सुधारक, ऑगस्ट १९९५) प्रा. व. वि. अकोलकरांनी कधी काळी पुनर्जन्मासंबंधी त्यांना अनुकूल असे जे चूक निष्कर्ष काढलेत त्या लेखाचे वाचन करून त्यांनी प्रश्नचिन्ह दिलेले आहे. त्यांच्या अश्रद्ध अशा भूमिकेला या लेखाने हादरा बसला. एखाद्या मृत व्यक्तीचा आत्मा दुसर्यां देहाचा आश्रय घेऊ …