ज्या विज्ञानाने मानवी जीवन आमूलाग्र बदलले, भारत-चीन यांसारख्या प्राचीन व आपल्या चाकोरीत शतकानुशतके चालत असलेल्या संस्कृतींना त्या चाकोरीतून काढून, एका अनोळखी व बिकट मार्गाला लावले, त्या विज्ञानाच्या अभ्यासाला सध्या सर्व शिक्षण-संस्थात अतोनात महत्व आलेले आहे. या शाखांना प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी कठोर परिश्रम करतात. मुलांनी (व मुलींनीसुद्धा) विज्ञानशाखेला जावे ही पालकांचीही महत्त्वाकांक्षा असते. विज्ञानाच्या लोकप्रियतेचे कारण मात्र निसर्गनियमांबद्दल मूलभूत जिज्ञासेपेक्षा, या अभ्यासक्रमातून पुढे तांत्रिक शिक्षणाच्या संस्थांची दारे उघडतात आणि डॉक्टर व इंजिनियर यांसारख्या पदव्या मिळाल्याने तरुण व तरुणी प्रतिष्ठेच्या नोकऱ्या मिळवू शकतात, हे असते.
विषय «विज्ञान»
औरस- अनौरसत्व, जनुकशास्त्र वगैरे…
(औरस-अनौरसाचा जगाच्या प्रारंभापासून नसला तरी तो खूप खूप जुना आहे. आणि फक्त भारतातच नाही, तर जगात सर्वत्र आहे. हा गुण करणाऱ्यांना चिकटत नाही, निरागस, नवजात अर्भकाला मात्र चिकटतो. एका नोबेल विजेत्याने आपल्या जन्माची कहाणी कशी उघड करून सांगितली आहे, ते पहा. अशी गोष्ट एखाद्याच्या बाबतीत घडावी ह्यात काहीच आश्चर्य नाही. वर म्हटल्याप्रमाणे असे खूप खूप पूर्वीपासून होतच आले आहे. आश्चर्य आहे ते त्याने ती एवढी मोकळेपणाने सांगावी ह्याचे. पॉल नर्स ह्यांना त्यांच्या जन्माची गोष्ट तशी कर्मधर्मसंयोगानेच कळली. तेव्हा तर त्यांना धक्का बसलाच.
महाभारत आणि कॉस्मॉस
माझी अगदी लहानपणाची टीव्ही पाहायची पहिलीवहिली आठवण म्हणजे महाभारतमालिका. त्याकाळात रंगीत टीव्ही खूप कमी असायचे. आमच्या घरी रंगीत टीव्ही असल्यामुळे शेजारीपण महाभारत पाहायला घरी यायचे. आमची बैठकखोली लोकांनी भरून जायची. महाभारतमालिकेच्या आधी आलेली रामायणमालिका मला फारशी आठवत नाही तेव्ही मी वयाने फार लहान होतो पण महाभारत मात्र मी आवर्जून पाहात असे. नवरससंपूर्ण पौराणिक कथा, अप्रतिम अभिनय आणि त्याच्या जोडीस असलेले भव्यदिव्य सादरीकरण, लोकांना टीव्हीला खिळवून ठेवायला लागणारे सगळेच पैलू त्यामध्ये होते. साहजिकच रामायण आणि महाभारत ह्या दोन्ही मालिका अत्यंत लोकप्रिय झाल्या आणि नकळत लोकांच्या आयुष्याच्या अविभाज्य घटक बनल्या.
विज्ञान आश्रमातील समुचित तंत्रज्ञान
ग्रामीण विकासासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग आवश्यक आहे, अशी कलबाग सरांची श्रद्धा होती. आपल्या कामाचा वेग, उत्पादकता व कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञान आपल्याला मदत करू शकते. म्हणून विज्ञान आश्रमात तंत्रज्ञानावर भर आहे.
कुठले तंत्रज्ञान कुठल्या भागात आणि कशासाठी सोयीचे आहे, हे पडताळून बघावे लागते. ते तंत्रज्ञान कोणत्या परिस्थितीत स्वीकारले जाईल ते तपासून बघावे लागते. हे तपासून बघण्याचे काम शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पामार्फत करता यावे असा आमचा प्रयत्न असतो. प्रदर्शनामध्ये त्यांना जे प्रकल्प करायचे असतात, त्यासाठी हेच प्रयोग देता येतात. गावातले विकासाचे जे प्रश्न आहेत, त्यांना उत्तरे शोधण्यासाठी काही तंत्रे वापरून बघितली जातात.
सरड्यांमधील लिंग गुणोत्तर – जादा नरसंख्येचा परिणाम
बहुसंख्य भारतीयांना अपत्य म्हणून मुलगे हवे असतात, आणि मुली नको असतात. पूर्वी मुलगी जन्मल्यास तिला मारून टाकायचे प्रयत्न केले जात असत. हेळसांड, अन्न तुटवड्याच्या काळांत उपासमार, हेही नित्याचे होते. आज गर्भजलपरीक्षा, अल्ट्रासाऊंड वगैरे तंत्रे वापरून मुलींना भ्रूणावस्थेतच ‘हेरून’ मारून टाकले जाते. या सर्व वृत्तींवर, त्या अनिष्ट असण्यावर मेगाटनांनी कागद आणि किलोलीटरांनी शाई खर्च झाले आहेत (तोंडच्या वाफेची तर गणतीच नाही.).
एकेकाळी असे मानले जात असे, की या ‘मुलगाच हवा’ वृत्तीमुळे मुलींचा तुटवडा उत्पन्न होईल. वंशवृद्धीसाठी आवश्यक अशा मुली दुर्मिळ होतील. यामुळे त्या ‘मूल्यवान’ ठरून त्यांना पूर्वीपेक्षा अधिक मानसन्मानाने वागवले जाईल.
मार्क्सवाद आणि संस्कृती
मार्क्सवाद म्हणजे खरे तर शास्त्रीय समाजवाद. त्याचा आणि संस्कृतीचा घनिष्ठ संबंध आहे. मार्क्सने माणसाची व्याख्याच स्वतःला आणि जगाला निर्माण करणारा, अशी केली आहे. निर्मिती ही सर्जनशील गोष्ट आहे. त्यामुळे मार्क्सवादात किंवा शास्त्रीय समाजवादात माणूस सर्जनशील आहे हे गृहीतकच आहे. दि. के. बेडेकर म्हणतात, माणूस हा केवळ समाज-क्रांतिकारक किंवा तर्कशास्त्र- निर्माता नाही तर तो दिव्यकथा-निर्माता, प्रतीक-निर्माताही आहे. नंतरच्या मार्क्सवादयांनी मात्र या दोन पैलूंकडे दुर्लक्ष केले. म्हणून युरोपातला मार्क्सवाद जडवादासारखा झाला. मुळात मार्क्सचे तत्त्वज्ञान माणसातील चैतन्यालाच आवाहन करते. यातून हे स्पष्ट होते, की मार्क्सवाद किंवा शास्त्रीय समाजवाद हा मानुषकेंद्री अध्यात्माशी सुसंगत आहे.
अनवरत भूमंडळ (२)
[मानवी व एकूण सजीवांचे आयुष्य, त्याचा आदि-अंत, त्याचे कारणपरिणाम, ते जेथे फुलते त्या जागेशी असलेले त्याचे नाते, त्याची स्वयंसिद्धता वा अवलंबित्व, विशाच्या विराट अवकाशातील त्याची प्रस्तुतता ह्या विषयांचे मानवी मनाला नेहमीच कुतूहल राहिले आहे. माणसाने विवेकवादी असण्या-नसण्याची व असावे-नसावेपणाची काही कारणे वा पूर्वअटीही ह्या मुद्द्यांध्येच दडून आहेत. त्यामुळे आ.सु.चा तर हा विशेष जिव्हाळ्याचा विषय आहे. ह्यावर वैज्ञानिक दृष्टिकोणातून लिहिलेली प्रभाकर नानावटींची मानवी अस्तित्व ही मालिका आपण गेल्या वर्षीपासून वाचत आहोतच. आता ही थोड्या वेगळ्या अंगाने लिहिलेली, विज्ञान व अध्यात्म ह्यांची सांगड घालणारी मालिका.
अनवरत भूमंडळ (१)
[मानवी व एकूण सजीवांचे आयुष्य, त्याचा आदि-अंत, त्याचे कारण- परिणाम, ते जेथे फुलते त्या जागेशी असलेले त्याचे नाते, त्याची स्वयंसिद्धता वा अवलंबित्व, विश्वाच्या विराट अवकाशातील त्याची प्रस्तुतता ह्या विषयांचे मानवी मनाला नेहमीच कुतूहल राहिले आहे. माणसाने विवेकवादी असण्या- नसण्याची व असावे नसावेपणाची काही कारणे वा पूर्वअटीही ह्या मुद्दयांमध्येच दडून आहेत. त्यामुळे आ. सु.चा तर हा विशेष जिव्हाळ्याचा विषय आहे. ह्यावर वैज्ञानिक दृष्टिकोणातून लिहिलेली प्रभाकर नानावटींची मानवी अस्तित्व ही मालिका आपण गेल्या वर्षीपासून वाचत आहोतच. आता ही थोड्या वेगळ्या अंगाने लिहिलेली, विज्ञान व अध्यात्म ह्यांची सांगड घालणारी मालिका.
अणुकचराः भीती व वास्तव
अणुकचरा जनसामान्यांसाठी एक कठीण व अमूर्त विचारधारणा असल्याने त्याबद्दल गैरसमज पुष्कळ आहेत. तसेच त्यामुळे अणुकचऱ्याबद्दल भीती निर्माण होणेही स्वाभाविक आहे. या सगळ्यामागचे मुख्य कारण किरणोत्सार किंवा ‘रेडिएशन’ या शब्दाने मानवी मनात जी कल्पनासृष्टी रुजवलेली आहे तीत सापडते. अणुकचरा काय असतो, तो कसा निर्माण होतो व त्याची सुरक्षित साठवण व योग्य विल्हेवाट कशी लावता येते, हे जरा पाहू.
सन १९९१ मध्ये अमेरिकेच्या ‘ऊर्जाविषयक जाणीव’ समिती (USCEA) साठी केलेल्या सर्वेक्षणातून ‘किरणोत्सार’ हा शब्द शारीरिक इजा (उदा. कॅन्सर व इतर असाध्य रोग, मृत्यू इ.)
आरोग्य आणि अंधश्रद्धा
आपण प्रत्येक घटनेचे कारण शोधतो. नको असलेल्या घटना टाळून हव्या असलेल्या घटना वारंवार घडविण्यासाठी ती पहिली पायरी आहे. घटनेच्या कारणशृंखलेतील आपल्या कुवतीचे दुवे शोधून त्यांवर नियंत्रण करण्याची आपली इच्छा असते. हे वर्णन विज्ञानाचे असले तरी उत्क्रांतीमुळे ते आपल्या स्वभावातच मुरले आहे.
अर्थात, उत्क्रांतीने मिळालेल्या इतर गुणांप्रमाणेच, कारण शोधण्याची कलासुद्धा अगदी प्राथमिक आहे. कुत्र्यांना अन्न देण्याच्या वेळेआधी इवान पावलॉव यांनी एक घंटानाद करण्याची सवय केली. रोज असा घंटानाद ऐकल्यानंतर निव्वळ घंटानाद ऐकूनच कुत्र्यांना लाळ सुटे. याचा अर्थ असा की सत्य सापडले नसले तरी वारंवार घडणाऱ्या काकतालीय न्यायावर (post hoc, ergo propter hoc) ठाम विश्वास ठेवण्याची सजीवांना सवय आहे.