विषय «उवाच»

नागरी प्रक्रिया

उद्योग, घरे आणि माणसे या तीन घटकांच्या एकत्रित संलग्न प्रक्रियेतून निर्माण होणारा भूभाग म्हणजे नागरी वस्ती. पोषक वातावरण मिळाले की ह्या घटकांमधून एखाद्या भूक्षेत्राचा विकास सुरू होतो. जसे जसे विकासाचे क्षेत्र विस्तारते तसा रिकामा भूभाग, परिसर इमारती, रस्ते अशा गोष्टींनी भरून जायला लागतो. यांच्या पाठोपाठ मालमत्तांनी, इमारतींनी व्यापलेला नागरी परिसर जुना होण्याची प्रक्रिया सुरू होते. कालांतराने अशा वस्तीमध्ये साचलेपणा, येऊ लागतो. वाढीचा काळ संपतो. वस्ती कुंठित होते. यासोबतच आर्थिक व्यवहारांचे स्वरूप बदलायलाही सुरुवात होते. अशा वस्तीच्या क्षेत्रात सतत नवीन नवीन गोष्टींची भरत पडत राहिली नाही तर अशा वस्त्यांची वाढ आणि विकास होण्याऐवजी हे क्षेत्र जुनाट घरे, आणि बंद उद्योगांचे माहेरघर होते.

पुढे वाचा

“सुलभ’ भारत

१)तुम्ही वा तुमचे जवळचे नातलग अजूनही हाताने विष्ठा साफ करतात का ? जर ‘हो’, तर हे स्वतःच्या घरात करता की नगरपालिकेच्या स्वच्छतागृहात ?

२) तुम्ही वा तुमचे जवळचे नातलग घरी संडास नसल्याने उघड्यावर जाता का ? जर ‘हो’, तर हे गावात होते की खेड्यात ?

३) तुमच्या शाळेत संडास आहे का, की नसल्याने त्याची गरज पडल्यास तुमची गैरसोय होते? जर ‘हो’, तर तुम्ही हा प्रश्न कसा हाताळता?

४) तुमच्या टप्प्यात येणाऱ्या रेल्वे, बस स्थानकांवर, बाजारांत, धार्मिक व पर्यटनाच्या स्थळांमध्ये संडास आहेत का ?

पुढे वाचा

‘काश’ राष्ट्रवाद: तिथेही तेच! 

पाकिस्तानातील प्रस्थापितांना वर्षांनुवर्षे एक काल्पनिक इतिहास शिकवला गेला आहे. तरुणांना स्वतःच्या राष्ट्राची महत्ता सांगणारी गुळगुळीत घोषणावाक्ये तपासायला शिकवले जातच नाही. पर्यायी दृष्टिकोन सुचवलेच जात नाहीत. यामुळे कार्ये आणि कारणे यांच्याबद्दल सार्वत्रिक अज्ञान आहे. आणि शिवाय याने ‘काश! वृत्ती रुजते. काश! इंग्रजांनी दक्षिण आशियात हिंदूंची बाजू घेतली नसती, तर!’ किंवा ‘काश. अमेरिकेने आपली वचने पाळून आपल्याला काश्मीर मिळवून दिला असता तर!’ असल्या सुलभीकृत विचारांमुळे विश्लेषणच थांबते. 

जोवर पाकिस्तानातील भडकावू घोषणा आणि ‘ब्रेनवॉशिंग’ संस्कृतीची जागा खऱ्याखुऱ्या वैचारिक विविधता येणार नाही, तोवर पाकिस्तान हे आधुनिक, कार्यप्रवण राष्ट्र होणार नाही.

पुढे वाचा

उलटे नियोजन

पाणी हवे आणि वीजही हवी; पण वीजनिर्मितीला पाणी देण्याची आमची तयारी नाही. पाणी संपले, तर औरंगाबादची तडफड बघवणार नाही, अशी भीती सर्वांना वाटते, ती अनाठायी नाही. परळी विद्युत केंद्रातील तीन संच आधीच बंद पडले आहेत. एक संच चालू आहे; पण त्याला पाणी कमी पडते. नाथसागराचे दरवाजे उघडले, परंतु तहानलेल्या औरंगाबादकरांच्या रेट्यापुढे ते बंद करावे लागले. नियोजनाचा अभाव असल्यामुळेच टँकरमुक्तीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्र दिवसेंदिवस टँकरग्रस्त होत चालला आहे. कोट्यवधी रुपये उधळून अनेक सिंचनप्रकल्प उभारले. 80 टक्के शेतीला आजही ओलितांची सोय नाही. जायकवाडी, खडकवासला किंवा आता कोरडीठाक पडलेली बिंदुसरा-मांजरासारखी धरणे खास शेतीसाठीच बांधली; पण ना शेती भिजली, ना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला.

पुढे वाचा

बॅक्टीरियांचे वंशज

एक जीवजात म्हणून पाहता आपण अजूनही स्वतःबद्दलच्या धारणांमध्ये जे विक्षिप्त वाटते त्याला घाबरतो. डार्विन होऊन गेल्यावरही किंवा डार्विनमुळेही, एक संस्कृती म्हणून आपल्याला आजही उत्क्रांतीमागचे विज्ञान समजत नाही. विज्ञान आणि संस्कृति यांच्यात संघर्ष झाला तर नेहमीच संस्कृतीचा विजय होतो. (पण) उत्क्रांतीच्या शास्त्रांची जास्त समजून घेण्याची पात्रता आहे – हो, माणसे उत्क्रांत झाली आहेत, पण कपी किंवा इतर सस्तन प्राण्यांपासूनच नव्हे. आपल्या पूर्वजांमध्ये एक लांबलचक बॅक्टीरियांची यादी आहे, अंतिमतः अगदी पहिला बक्टीरियाही त्यात येतो. [लिन मार्गुलिसच्या ‘सिंबायॉटिक प्लॅनेट’ (बेसिक बुक्स, 1998) च्या पुस्तकाच्या उपोद्घातातून]

प्रचंड धोका

एकलव्य या संस्थेचे काम आणि संस्थेच्या अनुभवांचे सार नजरेखालून घालणे महत्त्वाचे आहे. शासकीय शाळांतून प्रयोग किंवा उपक्रम यांना एकलव्यने विज्ञान शिक्षणाचे माध्यम बनवायचा प्रयत्न केला. त्यामुळे अनुभवाधाराने ज्ञान कमाविणे आणि ते वापरणे यांना महत्त्व मिळाले. याचा परिणाम असा झाला की अनेकांना विज्ञान सोपे आणि रंजक वाटू लागले.

इथेच सगळा घोटाळा झाला, असे मला वाटते. अनेकांना विज्ञान हा विषय रंजक आणि आवाक्यातील वाटू लागला, तसेच समजा इतर विषयांचेही झाले, तर मोठी अडचण समोर ठाकणार होती. ती म्हणजे सारेच विद्यार्थी हुशार ठरतील. त्याचवेळी अर्थार्जनाच्या चांगल्या संधी मात्र मोजक्याच राहिल्या तर निवड करायला फारशी जागा राहणार नाही.

पुढे वाचा

नीती ही मानवनिर्मितच

“इतिहासाचे सर्व विद्यार्थी राजवाडे या अनुभवी संशोधकाला ओळखतातच. काही जणांना वाटते की अस्तित्वात असलेली सर्व नीतीची तत्त्वे अनादि अनंत आकाशातून उतरलेली आहेत आणि येणाऱ्या अनंत काळातही तशीच राहतील. त्यांना ही नीतीची तत्त्वे मोडणे ही गुन्हेगारी क्रिया वाटते. अशा लोकांना (राजवाड्यांचे लिखाण वाचून) जाणवेल की नीतीसुद्धा मानवी सर्जनशीलतेतून व उत्क्रांतीच्या इच्छेतून उपजलेली एक ‘वस्तू’ आहे, एखाद्या पटाशी किंवा सुरीसारखीच. राजवाड्यांच्या शोधितांबद्दलचे आमचे निष्कर्ष आम्ही राखून ठेवतो, कारण आमचे त्यांच्याशी बरेच मतभेद आहेत.”
[कॉ. श्री. अ. डांगे यांनी सोशलिस्ट या इंग्रजी मासिकाच्या मे-जून १९२३ या अंकात लिहिलेली ही टीप भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या ग्रंथाच्या इंग्रजी ‘धारावाहिक’ प्रकाशनाची प्रस्तावना आहे.

पुढे वाचा

“आम्ही एकशेपाच आहोत”

शेतकऱ्यांना भेटायला मोटारीतून जाऊ नये, पायी गेले पाहिजे. आम्ही खेडेगावात इतके फिरलो की, आमचा अवधा वीस रुपये खर्च झाला. मराठे, ब्राह्मण वेगळे असले तरी लढाईचे वेळेस आम्ही एकशेपाच आहोत. आमचे बरोबर पथकात पोवाडे म्हणणारे व्हॉलंटियर्स होते. आम्ही पंधरावीस मंडळी झेंडा घेऊन प्रत्येक गावी जात होतो, गावात दूध मिळणे मुष्कील होई. खेड्यातील कुणब्याची भाषा आली पाहिजे. खेड्यात पुरुषवर्ग फारसा घरी नसतो. काही खेड्यात गेलो तो आमचे भोवती सर्व लुगडीच लुगडी दिसू लागली. आम्ही शेवटी येरवड्यास जाऊन आलो. तेथे जाताच राष्ट्रगीत म्हटले. तुरुंगाच्या दारात झेंडा उभा केला.

पुढे वाचा

“परंपरा”

“याहून महत्त्वाचा भाग समग्र मराठशाहीच्या आर्थिक पायाचा किंवा आत्यंतिक भाषेत बोलावयाचे म्हणजे हीस खरा पाया होता की नाही? कां ती केवळ बिनबुडाची होती?” . . . केतकर विनोदाने म्हणत असत की, मराठ्यांच्या मोहिमांचें मूळ सावकारांच्या तगाद्यांत शोधले पाहिजे! मानी बाजीराव कर्जाच्या भारामुळे ब्रीद्रस्वामींपुढे कसा नमत असें याबद्दलचे राजवाड्यांचे निवेदन प्रसिद्ध आहे. . . ही कर्जे, कधीच कां फिटली नाहीत? पुढील वसुलाच्या भरंवशावर आधींच रकमेची उचल करावयाची, असे सर्वांचेच व्यवहार सदैव कसे राहिले? यांचा शास्ता, नियंता कोणी नव्हताच काय? आमच्या सत्ताविस्ताराच्या आर्थिक पायामुळेच आमच्यांतील मिरासदारी वृत्ती, ऐदीपणा व गैरहिशेबीपणा हे आजचे पुढील दुर्गुण उत्पन्न झाले काय?

पुढे वाचा

अप्रिय मतांचे नियमन

ज्या मूर्ख मतांमुळे सार्वजनिक जीवनाला अपाय होण्याचा संभव नसेल त्याबद्दल कोणाला तुरुंगात घालणे मला अर्थशून्य वाटते. जर हा नियम टोकापर्यंत ताणला तर फारच थोडे लोक त्याच्या तडाख्यातून वाचतील. शिवाय अश्लीलतेचा बंदोबस्त कायदा आणि तुरुंगवास यांनी करण्याने फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होण्याचा संभव आहे. जे केवळ मूर्खपणाचे किंवा दुष्कर्म असेल त्याला मोहक वलय मात्र प्राप्त होते. राजकीय बंद्यांविषयी तर माझ्या भावना अधिक तीव्र आहेत. केवळ राजकीय मतांमुळे एखाद्याला तुरुंगात घालणे कितीही आकर्षक वाटले तरी त्याने त्या मतांचा प्रसार होण्याचाच संभव जास्त असतो. ते मानवी दुःखात भर घालण्यासारखे असून त्याने हिंसेला उत्तेजन मिळते यापलीकडे काही नाही.

पुढे वाचा