विषय «शिक्षण»

भ… भवितव्याचा!

शिक्षणव्यवस्थेविरुद्ध लढा हा पूर्वीपासून चालत आला आहे. पूर्वी काही लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले होते. आजकाल कायद्याने सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिला असला तरी शिक्षणातील नेमके मर्म काय याबाबतीत वयाच्या विशिष्ट टप्प्यावर आल्यावर; जेव्हा व्यक्ती सक्षम होऊन कारकीर्द घडवण्याच्या मार्गावर असतो तेव्हादेखील त्याचे मार्गदर्शन न झाल्याचे जाणवते. बहुतांश भाग ग्रामीण असून भारतामध्ये भवितव्याच्या केवळ ठराविक दिशाच निवडल्या जातात. त्यामागे परंपरागत जुने विचार, आर्थिक समस्या अशा वेगवेगळी कारणे आहेत. भवितव्य ऐन शिखरावर असताना आपण निवडलेला अभ्यासक्रम शिकूनदेखील त्यात गुणवत्ता नाही हे विद्यार्थ्यांस जाणवते.

पुढे वाचा

कृत्रिम बुद्धिमत्ता : आळं की आळा

नोव्हेंबर २०२२ च्या शेवटी जन्म झालेल्या चॅटजीपीटीने कृत्रिमप्रज्ञेच्या जगतात खळबळ उडवली. चॅटजीपीटीची महती हा हा म्हणता बहुतांश सांख्यीक-साक्षर जगतात पोचली आणि उलट-सुलट चर्चांना ऊत आला. चॅटजीपीटी हा तुमच्यासोबतच्या चर्चेतून तुमच्या बहुतांश प्रश्नांची उत्तरे देणारा तुमचा सखा आहे(१). लार्ज लॅंग्वेज मॉडेलवर (LLM) आधारित असल्याने निबंध लिहिणे, कविता करणे, ज्या ज्या विषयांची माहिती उपलब्ध आहे त्या विषयांवर संभाषण करणे यात तो तरबेज आहे. OpenAI च्या या प्रारूपापाठोपाठ बाजारात अनेक प्रारूपे आली. आधी आकाराने गलेलठ्ठ असलेली ही प्रारूपे फाईन-ट्युनिंगद्वारे हळूहळू रोड होताहेत.

पुढे वाचा

कृत्रिमप्रज्ञेच्या युगात भविष्यातील शिक्षण

सगळीकडे आर्टिफिशिअल इंटलिजन्सची चर्चा सुरू आहे. Chat-GPT, AI हे शब्द विविध समाजमाध्यमांत, न्यूज चॅनेल्सवर ऐकू येत आहेत. काही जणांच्या मते हे खूळ आहे. तर काही जणांना वाटते की यामुळे जग बदलेल. पण खरे सांगू का? तुम्हाला-आम्हाला काय वाटते ते आता महत्त्वाचे राहिलेले नाही. त्या AI रोबोट्ला काय वाटते ते महत्त्वाचे आहे. हो, बरोबर वाचताय तुम्ही. कारण माणसांनी जरी AI रोबो बनवले असले तरी त्यांना माणसाची बुद्धिमत्ता प्रदान करून दिल्यामुळे हे माणसांपेक्षा जलदगतीने आणि अचूक निर्णय घेऊ शकतात. म्हणून तर मोठ्या मोठ्या आस्थापनांमध्ये बरेच ठिकाणी CEO म्हणून AI रोबोट्सना नियुक्त केले गेले आहे. 

पुढे वाचा

समाजमाध्यमांचा ग्रामीण, आदिवासी समुदायात शिरकाव…

२०१३ मध्ये मी फेसबुक उघडलं तेव्हा, आदिवासी समुदायातला एखादा दुसराच फेसबुक वापरणारा युवक असेल. परंतु गेल्या आठ दहा वर्षामध्ये माध्यमांचा जो शिरकाव मानवी समाजात झाला आहे ना, त्याचे परिणाम ग्रामीण आणि आदिवासी समुदायातली मुलंही भोगत आहेत. व्हॉट्सॲप, फेसबुक, टीक्टॉक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, ही सगळी समाजमाध्यमे आदिवासींच्या मुलांना आता परिचयाची झाली आहेत. चॅटजीपीटीही जास्त दूर नाही. आणि ही सगळी माध्यमे मुलांकडून अतिप्रमाणात वापरली जात असल्यामुळे त्याचा परिणाम प्रत्येक घरामध्ये दिसतोय. मुलांच्या हट्टापायी, किंवा मुलं सारखी चोरून दुसऱ्यांचे मोबाईल पाहत राहतात, म्हणून दहा ते बारा हजार रुपये किमतीचे मोबाईल फक्त पाच ते सहा वर्षांच्या मुला-मुलींना घेऊन दिलेले पालक मी ग्रामीण भागात पाहिले आहेत.

पुढे वाचा

भीक की देणगी?

दि. ९ डिसेंबर रोजी पैठण येथील कार्यक्रमात मा. चंद्रकांत पाटील भाषण करत होते. या भाषणात संत विद्यापीठ सुरू करण्याच्या संदर्भाने पाटील म्हणाले, “शिक्षणसंस्था सुरू करण्यासाठी सरकारवर अवलंबून राहण्याची गरज काय? शाळा सुरू करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांना कुणीही अनुदान दिले नाही, तर त्यांनी भीक मागून शाळा चालविल्या” या वक्तव्यानंतर माध्यमांमध्ये, समाजामध्ये असंतोष पसरून पाटलांवर चौफेर टीका सुरू झाली होती. ‘भीक’ या एका शब्दामुळे टीका सुरू झाली होती. “या महापुरुषांनी वर्गणी मागून, देणग्या गोळा करून शाळा चालविल्या” असे म्हटले असते तर हा वाद सुरू झाला नसता; पण त्यांनी जाहीरपणे ‘भीक’ हा शब्द वापरला.

पुढे वाचा

तांड्यावरच्या मुलांचं शिक्षण आणि प्रश्न

विदर्भातल्या अकोला, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांत फासेपारधी समाज मोठ्या प्रमाणात राहतो. फासेपारधी समुदायाच्या मुलांच्या शिक्षणावर काम करताना काही गोष्टी प्रकर्षाने मला दिसल्या. पहिली गोष्ट म्हणजे फासेपारधी समाजाचा परंपरागत शिकार व्यवसाय आणि त्यांचं स्थलांतर! १९७२च्या वन्यजीवसंरक्षण कायद्यानुसार शिकार करणं हे जरी कायदेसंमत नसलं तरी आत्ताही काही भागांत फासेपारधी समुदायाकडून लपून शिकार केली जाते. आणि हा व्यवसाय करण्यासाठी फासेपारधी समाजातील कुटुंबं स्थलांतर करतात. एका गावातून दुसऱ्या गावाच्या जंगलांमध्ये आसऱ्याने मुक्काम करून राहणे असं चालतं. 

मागच्या वीस-पंचवीस वर्षांत फासेपारधी समाजातील माणसं काही प्रमाणात तांडा वस्ती करून एका ठिकाणी राहू लागली आहेत.

पुढे वाचा

आदिवासी तरुणांमध्ये जाणीवजागृती

इंग्रजांचा अंमल सुरू होण्यापूर्वी भारतातील वनांचे व्यवस्थापन त्या त्या भागातल्या गावसमाजाकडून होत असे. भारतातील घनदाट वनराईचे इंग्रजांना फार अप्रूप वाटू लागले. कारण जहाजबांधणी, रेल्वेस्लीपरनिर्मिती व इतर उपयोगासाठी त्यांना हवे असणारे इमारती लाकूड भारतात मुबलक होते. इंग्रजांनी भारतात त्यांचा अंमल प्रस्थापित केल्यावर १८६५ व १८७८मध्ये कायदे करून भारतातील वनसंपत्ती ही सरकारी मालमत्ता असल्याचे घोषित केले. त्यामुळे वनांवर अवलंबून असणारे, वनक्षेत्रात जमीन कसणारे आणि पिढ्यानपिढ्या वनांचे संवर्धन करणारे आदिवासी हे वनावर अतिक्रमण करणारे चोर ठरले. भारत स्वतंत्र झाल्यावरही या परिस्थितीत फारसा फरक पडला नाही.

पुढे वाचा

दर्जात्मक शिक्षणाची चळवळ – जमिनीवरील आव्हाने

दर्जात्मक शिक्षणासाठी अब्जावधी रुपये खर्च होत आहेत. अनेक ठिकाणी यावर काम होत आहे, पैसे खर्च होत आहेत, पण अपेक्षित दिशेने प्रगती मात्र झालेली दिसत नाही. दर्जात्मक शिक्षण कसे असावे हे अनेकांनी आपापल्या परीनं समजून घेण्याचा प्रयत्नदेखील झालेला दिसतो. परंतु तरी, शिक्षणाला सर्वसमावेशक बनवण्याचे किंवा शिक्षणाचा दर्जा वाढवण्याचे काम प्रत्यक्षात उतरवणे आपल्याला इतके आव्हानात्मक का वाटते आहे? शिकण्याच्या वेगवेगळ्या जागा निर्माण करून मुलांना शैक्षणिक संधी देऊ इच्छिणाऱ्या एका सेवाभावी संस्थेतील आपले चार मित्र त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पुढे वाचा

प्रभावी शिक्षणाची ‘घरोघरी शाळा’

संकटे माणसाला संधी देतात. नवनव्या गोष्टी करण्यास उद्युक्त करतात. वेगळी वाट चोखाळण्याची प्रेरणा देतात. कोरोनाकाळाने जणू याचीच प्रचिती दिली. या आव्हानात्मक परिस्थितीत माणसांपुढे कितीतरी संकटे निर्माण झाली. मात्र त्यातूनच संधीचे आशादायक कवडसेही प्रत्ययास आले.

मुळातच जीवनाच्या सर्वच क्षेत्रांवर कोरोनाने घाला घातला. शिक्षण हे महत्त्वाचे क्षेत्रदेखील त्याला अपवाद उरले नाही. कोरोना काळात शाळा बंद झाल्या. विद्यार्थी दिवसेंदिवस घरातच कोंडले गेले. त्यांच्या शिक्षणासमोर प्रश्नचिन्हे लागली. अर्थात यातूनही विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने नवनव्या संकल्पना, नवनवे प्रयोग या काळात आकारास आले. ऑनलाइन शिक्षणासारखे शब्द शैक्षणिक प्रवाहात रूढ झाले.

पुढे वाचा

ऑनलाईन शिक्षणाचं आभासी जग

२ वर्षे मुलांना ऑनलाईनच्या प्रवाहात आणतानाही धडपड झाली. आणि याच तंत्रज्ञानाचा सफाईदार वापर झाला तेव्हाही ताशेरे ओढले गेले, मुळात कुठलाही नवीन येणारा बदल स्वत:ची नवी आव्हाने घेऊन येणारच. यावेळीही जेव्हा शिकताना अडचणी येतात, तेव्हा तिथूनच नन्नाचा पाढा वाचला जातो. करोनाकाळात शिक्षणाचं गणित बिघडले खरे, पण या परिस्थितीने बऱ्याच सुधारित नवनवीन कल्पना दिल्या हेही तितकेच खरे आहे.

खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि अनुभवायला मिळाल्या. अप्रतिम काही तरी नवीन शिकलो आणि ते शिक्षक म्हणून मुलांपर्यंत पोहोचवताना, नव्याने शिकवताना असंख्य अडचणी येत असताना त्याची मजा काही औरच होती.

पुढे वाचा