वसंत पळशीकर - लेख सूची

जात-पात

जातिसंस्थेला व स्पृश्यास्पृश्यतेला खऱ्या अर्थाने मूठमाती द्यावयाची असेल तर शूद्र-अतिशूद्र ह्यांच्याकडे परंपरेने आलेल्या कष्टकरी व्यवसायांना व श्रमनिष्ठ जीवनाला प्रतिष्ठा व सन्माननीय उत्पन्न मिळवून देणे अगत्याचे आहे. प्रत्येकाला उच्चशिक्षित पांढरपेशा जीवनशैलीत प्रवेश मिळाला तर जन्माधिष्ठित जातपात कदाचित उखडली जाईल, पण शूद्र, अतिशूद्र नव्या स्वरूपात कायमच राहतील. तसेच बहीण-भावंडवृत्ती जर जीवनाची बैठक नसली, तर शोषण, अन्याय, दडपणूक …

मर्यादित स्त्रीमुक्ती

कुटुंबनियोजन, बालसंगोपन ह्यांविषयीच्या धारणा, त्याच्याशी निगडित तंत्रविज्ञान व सामाजिक संस्था ह्यांच्यामुळे स्त्रियाही सड्या राहू शकतात. म्हणून आता सत्ता, मत्ता व प्रतिष्ठा ह्यांच्यासाठी पुरुषसत्ताक समाजव्यवस्था असण्या-स्वीकारण्याची अपरिहार्यता फारशी उरली नाही. ही तशी चांगलीच घडामोड असली तरी एक प्रकारची दिशाभूल ह्या कारणाने झाली आहे. पुरुषसत्ताक व्यवस्था व संस्कृती एवढी दृढमूल झालेली आहे की, त्या चौकटीत समानता, स्वतंत्रता …

“धर्मप्राय” श्रद्धा

आ.सु.(१२.५) मध्ये श्री. सुधीर बेडेकर यांचे ‘धर्मश्रद्धा आणि दि. के. बेडेकर’ हे टिपण प्रसिद्ध झाले आहे. आंदोलन या मासिकाच्या ऑगस्ट २००० च्या अंकात माझा ‘धर्मप्राय श्रद्धेची सार्थकता’ हा लेख प्रसिद्ध झाला. त्याचा संक्षेप आ.सु. (११.८) मध्ये प्रसिद्ध झाला व त्यावर श्री. दि. य. देशपांडे यांची टिप्पणीही प्रसिद्ध झाली. प्रस्तुत संक्षेप मी केला नव्हता; तसेच, तो …

कुटुंबकेन्द्रित समाज आणि स्त्री-केन्द्रित कुटुंब (भाग २)

‘स्त्रीकेन्द्रित कुटुंब’ याचा अर्थही स्पष्ट करण्याची गरज आहे. कुटुंब हे किमान द्विकेन्द्री तर असते, व असायलाही हवे. ते बहुकेन्द्री असणे अधिक इष्टही ठरेल. पण ‘स्त्रीकेन्द्री’ असे म्हणण्यामागे, आजचे बिघडलेले संतुलन पुन्हा एकवार दुरुस्त करण्याची गोष्ट प्रधान असावी. कुटुंबाच्या गाभ्याशी मुले व त्यांचे संगोपन ही गोष्ट आहे. याचाच अर्थ मातृत्व व पितृत्व या दोन्ही भूमिका योग्य …

कुटुंबकेन्द्रित समाज आणि स्त्री-केन्द्रित कुटुंब (भाग १)

चिं. मो. पंडित यांनी (आ.सु. ११.११, १२.३) एका मोठ्या व महत्त्वाच्या विषयाला तोंड फोडले आहे. भविष्यातली समाजव्यवस्था ‘स्त्री-केन्द्री कुटुंबव्यवस्थे’ वर आधारित असावी असे मत मांडणाऱ्यांचा भूमिकेची ते वेगवेगळ्या अंगांनी पाहणी / तपासणी करतात. यासाठी जो ‘अप्रोच’ त्यांनी घेतला आहे व जी पद्धती अवलंबिली आहे ती फलदायी ठरण्याची शक्यता आहे. कुटुंब हे समाजाच्या बांधणीचे पूर्वापार प्राथमिक …

धर्मप्राय श्रद्धेची सार्थकता

निसर्गसृष्टीतील घडमोडींविषयीचे वैज्ञानिक अज्ञान, त्यापोटी वाटणारे भय आणि येणारे दुबळेपण, निसर्गाच्या अनाकलनीय शक्तींना ‘संतुष्ट’ करून स्वतःचे जीवन आश्वस्त, सुरक्षित व समृद्ध करण्याची कांक्षा व धडपड यामधून ‘धर्म’ या गोष्टीचा उदय झाला, ही एक ‘बुद्धिप्रामाण्यवादी’ वर्तुळातील प्रतिष्ठित व शिष्टमान्य मांडणी आहे. आधुनिक विज्ञानाच्या युगाच्या उत्कर्षाने ज्ञानाची प्रभा सर्वदूर पसरल्या-नंतर, ज्ञानांधकारात भरभराटलेल्या धर्माची व धर्मसंस्थेची गरज संपुष्टात …

धारणात् धर्म इत्याहुः।

नोव्हेंबर-डिसेंबर १९९२ ते जून १९९३ या दरम्यान आजचा सुधारकच्या अंकांमधून दि. य. देशपांडे, श्री. गो. काशीकर व दिवाकर मोहनी यांच्यात झालेली चर्चा परवा सलगपणे वाचली. वेगळ्या दिशेने मुद्द्याला भिडायला हवे असे मला दिसते. काशीकर म्हणतात त्याप्रमाणे “समाजाचा घटक ह्या नात्याने म्हणजे समाजधारणेच्या दृष्टीने उपयुक्त असा व्यक्तींचा आचार-विचार-समूह म्हणजे धर्म” ही व्याख्या करून चर्चेला आरंभ होऊ …

परिसंवाद निसर्ग आणि मानव – २

साधनाच्या (१८ जुलै) अंकातील ‘निसर्ग आणि मानव या आपल्या लेखात श्री. नानासाहेब गोरे यांनी म्हटले आहे, आदिम क्षणापासून या चालू घटकेपर्यंत निसर्ग होता तसाच राहिला आहे : लहरी, निर्हेतुक.’ त्यांनी मानवाचे आणि निसर्गाचे स्वर पूर्वीच्या काळी कधी तरी खरोखर जुळले होते का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. लेखाच्या अखेरीस ‘स्वस्थितिमग्न निसर्ग व विज्ञानधर पुरुषार्थी मानव …

परिसंवाद निसर्ग आणि मानव -५

दि. य. देशपांडे यांना उत्तर – उत्तरार्ध वसंत पळशीकर (या लेखाचा पूर्वार्ध आजचा सुधारकमार्च ९३ या अंकात आला आहे.) ६ डेव्हिड बोम (Bohm) या भौतिकी वैज्ञानिकांचे एक विधान पुढीलप्रमाणे आहे: ‘We have seen that each world-view holds within itself its own basic notions of order. What is order ? How we do presuppose that there …

चर्चा प्रा. शेषराव मोरे यांनी सादर केलेल्या पुराव्यांविषयी

आजचा सुधारक फेब्रुवारी १९९३ च्या अकांत प्रा. शेषराव मोरे यांनी माझ्या संदर्भात काही विधाने केली आहेत (पृ. ३४८-५०).पृ. ३५० वर ते म्हणतात, ‘अवतरणे जेथून घेतली त्या ग्रंथातील पृष्ठांकांचा उल्लेख पळशीकरांनी कुठेही केलेला नाही. मूळ हस्तलिखितात असे पृष्ठांक होते, मात्र प्रकाशित लेखात पळशीकरांनी ते येऊ दिलेले नाहीत, याचा पुरावा आम्ही ग्रंथात सादर केलेला आहे. सावरकरांना अनुवंशवादी …

पत्रव्यवहार धर्माचा स्वीकार व विवेकनिष्ठा

कोणत्याही गोष्टीचे अस्तित्व वा नास्तित्व सिद्ध करण्यासाठी आपण पुरावा ग्राह्य (अग्राह्य /पर्याप्त/ अपर्याप्त मानतो तेव्हा आपण एका चौकटीत तो निवाडा करीत असतो. त्या चौकटीत त्या गोष्टीचे त्या चौकटीतील विशिष्ट अर्थाने अस्तित्व नाही, व कधीच सिद्ध होऊ शकणार नाही, असे विधान करता येईल. ऐंद्रिय अनुभवप्रामाण्यवाद वा बुद्धिप्रामाण्यवाद या चौकटीत ज्यांचे नास्तित्व स्वीकारावे लागते अशा काही गोष्टी …

संपादकीयांविषयी

आजचा सुधारकच्या नोव्हेंबर-डिसेंबर १९९२ च्या अंकातील दोन्ही संपादकीयांविषयी काही प्रतिक्रिया येथे नोंदवू इच्छितो. (१) डॉ. रूपा कुळकर्णी यांच्या संदर्भातील संपादकीय आजचा सुधारक हे विवेकवादाला वाहिलेले मासिक आहे याचा अर्थ धर्म स्वीकारणाच्या व्यक्ती संपादक वा सल्लागार राहू शकत नाहीत असा करणे अविवेकी आहे. अंतिमतः ईश्वराच्या एक ना एक स्वरूपाच्या अस्तित्वाच्या स्वीकारावर धर्माची उभारणी होते असे मानले …

चर्चा – निसर्ग आणि मानव

प्रा. दि. य. देशपांडे यांच्या निसर्ग आणि मानव (आजचा सुधारक नोव्हें.डिसें. ९३) या लेखात त्यांना म्हणावयाचे आहे ते असे : -१.- चेतन-अचेतन असा फरक करण्याची कसोटी कोणती?माणसाला त्याच्या ठायीच्या चेतनेचा जसा स्वानुभव येतो, तिचे ज्या स्वरूपाचे आत्मभान त्याला असते तसा स्वानुभव येणे व आत्मभान भाषेद्वारा प्रकट करता येणे ही कसोटी मानली तर, प्रा. देशपांडे यांचे …

चर्चा- डॉ. प्रदीप पाटील यांना उत्तर (उत्तरार्ध)

धर्मसुधारणा कशास म्हणावयाचे याची स्पष्टता करावी लागेल. तसेच हिंदुधर्माभिमानी’ या शब्दाची. एकोणिसाव्या शतकामध्ये महाराष्ट्रात सनातनी ब्राम्हणांचा एक पक्ष अस्तित्वात होता. यांच्यासाठीच हा शब्द वापरावयाचा का? तसेच हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इत्यादी हिंदुत्ववादी संघटना, पक्ष, चळवळी यातील व्यक्तींसाठी हाशब्द राखून ठेवायचा का? अशी व्याख्या केली तर न्यायमूर्ति रानडे, संत गाडगे महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, …

पत्रव्यवहार

श्री. संपादक आजचा सुधारक स. न. वि. वि. श्री. निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी माझे वाक्य उद्धृत करताना त्याच वेळी, दुसर्याअ अंगाने हे शब्द गाळले आहेत. सावरकरांच्या सुधारणेची प्रेरणा त्यांच्या अनुयायांवर जे परिणाम घडवून आणताना दिसते त्याकडे मला लक्ष वेधायचे होते. सुधारणेमागील प्रेरणा आणि परिणाम यांचा काही अंगभूत संबंध आहे असे मला सुचवावयाचे होते. त्यांनी सावरकरांचे जे …

चर्चा-डॉ. प्रदीप पाटील यांना उत्तर

डॉ. प्रदीप पाटील यांनी (आजचा सुधारक मे-जून ९२) उपस्थित केलेल्या तेरा मुद्द्यांसंबंधी लिहिण्याची सुरुवात शेवटल्या वाक्यातील वैज्ञानिक’ या शब्दापासून करतो. तंत्रवैज्ञानिक मार्ग वा उपाय म्हणजे काय हे चटकन कळते. वैज्ञानिक मार्ग म्हणजे काय? आधुनिक पाश्चात्य विज्ञानाच्या मर्यादेत बोलावयाचे तर भौतिक जगाविषयीचे एका विशिष्ट प्रकारचे ज्ञान म्हणजे (आधुनिक पाश्चात्य) विज्ञान होय. हे ज्ञान पक्के असते व …

चर्चा-केशवराव जोशी यांच्या पत्रास उत्तर

श्री. केशवराव जोशी यांचा मी आभारी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव मी उल्लेख केलेल्या नामवलीत घेणे शक्य होते. पं. नेहरूंनी, सावरकरांप्रमाणे, जाणीवपूर्वक समाजसुधारणेचे कार्य केले असे म्हणता येणार नाही. जसे रानड्यांचे शिष्य नामदार गोखले यांनीही केले नाही. पण या दोघांचेही जीवन व कार्य सामाजिक सुधारणांना उपकारक ठरले. पं. नेहरू दीर्घकाळ पंतप्रधान नसते तर केंद्रशासनाचे वळण …

प्रा. स. रा. गाडगीळांना उत्तर

श्री. स. रा. गाडगीळ यांनी ‘सेक्युलॅरिझम’ या शब्दाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे. “लौकिक-ऐहिक व्यवहाराचे नियंत्रण करणारी शासनसंस्था (स्टेट) आणि पारलौकिक संकल्पनेच्या नावे लौकिक व्यवहाराचे नियमन करू पाहणारी धर्मसत्ता यांची पूर्ण फारकत म्हणजे सेक्युलॅरिझम”. त्यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे युरोपात दीर्घकाळ संघर्ष चालला तो धर्मपीठ (चर्च) व राजसत्ता यांच्यात. कशावरून? तर अंतिम सार्वभौम सत्ता कोणाच्या हाती असावी, आणि …

सावरकरांचा हिंदुत्वविचार

प्रा. स. ह. देशपांडे यांच्या लेखाला उत्तर (उत्तरार्थ) भारतात निर्माण झालेल्या धर्माचे अनुयायी ते सर्व हिंदू, नास्तिक मते बाळगणारेही हिंदू अशा प्रकारची व्याख्या केल्याने व्यवहारातली परिस्थिती बदलत नाही, शीख, बौद्ध, व जैन स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यास तयार नाहीत. व्याख्येनुसार हिंदू असूनही आदिवासींना हिंदू धर्माच्या व संस्कृतीच्या तथाकथित मुख्य प्रवाहात आणण्याचा कार्यक्रम आवजून राबविला जातोच आहे. …

सावरकरांचा हिंदुत्वविचार

प्रा. स. ह. देशपांडे यांच्या लेखाला उत्तर(१) आजचा सुधारकन्या सप्टेंबर-ऑक्टोबर १९९१ च्या अंकातील प्रा. स. ह. देशपांडे यांच्या ‘सावरकरांचा हिंदुत्वविचार’ या लेखात उपस्थित केलेल्या मुद्द्यांसंबंधी माझी प्रतिक्रिया व विचार नोंदवीत आहे. सावरकर थिोनटिक स्टेटचा पुरस्कार करीत होते असे मी म्हटलेले नव्हतेच. राष्ट्रवादाची कोणती जातकुळी त्यांना अभिप्रेत होती, हा प्रश्न मग उरतो. याच लेखातले आ. देशपांडे …