विवाह आणि नीती - लेख सूची

विवाह आणि नीती (भाग १)

बर्ट्रांड रसेल (१८७२ ते १९७०) हे विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ होते असे सामान्यपणे मानले जाते. तत्त्वज्ञानाखेरीज सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक इत्यादि विषयांवरही त्यांनी विपुल लेखन केले. त्यांचे लिखाण नेहमीच अतिशय मूलगामी, सडेतोड, निर्भय आणि विचारप्रवर्तक असे. त्यांचा Marriage and Morals (१९२९) हा ग्रंथ अतिशय प्रसिद्ध असून तो अत्यंत प्रभावीही ठरला आहे. त्यात रसेल यांनी …

विवाह आणि नीती (भाग २)

मातृवंशीय समाज वैवाहिक रूढींमध्ये नेहमीच तीन घटकांचे मिश्रण आढळते: (१) साहजिक किंवा सहजात किंवा राजप्रवृत्तिमय (instinctive), (२) आर्थिक, आणि (३) धार्मिक. हे घटक स्पष्टपणे वेगळे दाखविता येतात असे मला म्हणायचे नाही; जसे ते अन्य क्षेत्रात वेगळे दाखविता येत नाहीत, तसेच ते येथेही येत नाहीत. दुकाने रविवारी बंद असतात याचे मूळ धार्मिक आहे. पण आज ही …

विवाह आणि नीती (भाग ३)

पितृसत्ताक व्यवस्था पितृत्व या शरीरशास्त्रीय गोष्टीची ओळख पटल्याबरोबर पितृत्वाच्या भावनेत एक नवीन घटक प्रविष्ट झाला आणि त्यामुळे जवळजवळ सगळीकडे पितृसत्ताक समाजांची निर्मिती घडून आली. अपत्य हे आपले ‘बीज’ आहे हे ओळखल्याबरोबर पित्याच्या अपत्यविषयक भावकंदाला (sentiment) दोन गोष्टींमुळे नवे बळ लाभते – अधिकाराची आवड आणि मृत्यूनंतर जीवनाची इच्छा. आपल्या वंशजांचे पराक्रम हे एका अर्थाने आपलेच पराक्रम …

विवाह आणि नीती (भाग ४)

लिंगपूजा, तापसवाद आणि पाप जेव्हा पितृत्वाचा शोध लागला त्या क्षणापासून धर्माला लैंगिक व्यवहारात मोठा रस उत्पन्न झाला. हे अपेक्षितच होते; कारण जे जे गूढ आहे आणि महत्त्वाचे आहे अशा सर्व गोष्टींत धर्म रस घेतो. कृषीवलावस्था आणि मेंढपाळ अवस्था यांच्या आरंभीच्या काळात राहणाऱ्या मनुष्यांच्या दृष्टीने सुपीकपणा, मग तो जमिनीचा असो, गुराढोरांचा असो, किंवा स्त्रियांचा असो, ही …

विवाह आणि नीती (भाग ५)

ख्रिस्ती नीती‘विवाहाची मुळे कुटुंबात रुजलेली आहेत, कुटुंबाची विवाहात नाहीत’ असे वेस्टरमार्क म्हणतो. हे मत ख्रिस्तपूर्व काळात उघडे सत्य म्हणून स्वीकारले गेले असते; परंतु ख्रिस्ती धर्माच्या आगमनानंतर ते एक महत्त्वाचे विधान झाले असृन त्याचे प्रतिपादन त्यावर जोर देऊन करावे लागते. ख्रिस्ती धमनि, आणि विशेषतः सेंट पॉलने, विवाहाविषयी एक अगदी नवीन कल्पना मांडली: ती अशी की विवाह …

विवाह आणि नीती (भाग ६)

कल्पनात्म प्रेम (Romantic Love) ख्रिस्ती धर्म आणि बर्बर टोळ्या यांच्या विजयानंतर म्हणजे रोमन नागरणाच्या (civilization) पराजयानंतर स्त्री आणि पुरुष यांचे संबंध कित्येक शतकांत गेले नव्हते अशा पशुतेच्या पातळीवर गेले. प्राचीन जग दुराचारी होते, पण ते पाशवी नव्हते. तमोयुगांत धर्म आणि बर्बरता यांनी संगनमत करून जीवनाच्या लैंगिक अंगाचा अधःपात घडवून आणला, विवाहात पत्नीला कसलेच हक्क नव्हते; …

विवाह आणि नीती (भाग ७)

स्त्रीमुक्ती लैंगिक नीती सध्या संक्रमणावस्थेत आहे याची मुख्यतः दोन कारणे आहेत. पहिले, संततिप्रतिबंधाच्या साधनांचा शोध, आणि दुसरे, स्त्रियांची मुक्ती. यांपैकी पहिल्या कारणाचा विचार मी नंतर करणार आहे; दुसरा या प्रकरणाचा विषय आहे. स्त्रियांची मुक्ती हा लोकशाही चळवळीचा भाग आहे. तिचा जन्म फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात झाला. आपण वर पाहिल्याप्रमाणे या राज्यक्रांतीत वारसाहक्कविषयी कायद्यात कन्यांना अनुकूल असा …

विवाह आणि नीती (भाग ८)

लैंगिक ज्ञानावर प्रतिषेध (Taboo) (उत्तरार्ध) या प्रकरणात मी लैंगिक आचार कसा असावा याचा विचार करीत नसून, लैंगिक विषयांच्या ज्ञानासंबंधी आपली अभिवृत्ती (attitude) काय असावी याचा विचार करतो आहे. अल्पवयीन मुलांना लिंगविषयक ज्ञान देण्याच्या संबंधात आतापर्यंत मी जे म्हटले त्यास सर्व प्रबुद्ध आधुनिक शिक्षणतज्ज्ञांची सहानुभूती माझ्या बाजूने आहे अशी मला आशा आणि विश्वासही आहे. परंतु आता …

विवाह आणि नीती (भाग ९)

मानवी जीवनात प्रेमाचे स्थान बहुतेक सर्व समाजांची प्रेमविषयक अभिवृत्ती (attitude) दुहेरी राहिली आहे. एका बाजूला प्रेम काव्य, कादंबरी आणि नाटक यांचा प्रमुख विषय आहे; आणि दुसऱ्या बाजूला बहुतेक समाजशास्त्रज्ञांचे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष असते, आणि आर्थिक किंवा सामाजिक सुधारणांच्या योजनांत प्रेमाचा समावेश अभीष्ट उद्देशात केला जात नाही. मला ही अभिवृत्ती समर्थनीय वाटत नाही. प्रेम ही मानवी …

विवाह आणि नीती (भाग १०)

विवाह या प्रकरणात मी विवाहाची चर्चा केवळ स्त्रीपुरुषांमधील संबंध या दृष्टीने, म्हणजे अपत्यांचा विचार न करता, करणार आहे. विवाह ही कायदासंमत संस्था आहे हा विवाह आणि अन्य लैंगिक संबंध यांतील भेद आहे. विवाह ही बहुतेक सर्व देशांत एक धार्मिक संस्थाही असते, पण ती कायदेशीर आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे. आदिम मानवांतच केवळ नव्हे तर वानरांत …

विवाह आणि नीती (भाग ११)

वेश्यावृत्ती जोपर्यंत प्रतिष्ठित स्त्रियांचे पातिव्रत्य ही गोष्ट महत्त्वाची मानली जाते तोपर्यंत विवाहसंस्थेला आणखी एका पूरक संस्थेची जोड द्यावी लागते, किंबहुना ही पूरक संस्था विवाहसंस्थेचाच भाग मानावा लागेल. मला अभिप्रेत असलेली संस्था म्हणजे वेश्यासंस्था होय. लेकी ज्या परिच्छेदात वेश्यावृत्ती गृहाच्या पावित्र्याची आणि पत्न्या आणि कन्या यांच्या शुचितेची रक्षक आहे असे म्हणतो तो प्रसिद्ध आहे. त्यात व्यक्त …

विवाह आणि नीती (भाग १२)

आजचे कुटुंब आपण प्रकरण २ आणि ३ यांत मातृवंशीय आणि पितृसत्ताक कुटुंब आणि लैगिक-नीतिविषयक प्रारंभिक कल्पनांवर त्यांचा परिणाम यांचा विचार केला याचे वाचकाला एव्हाना विस्मरण झाले असेल. ती कुटुंबविषयक चर्चा फिरून सुरू करण्याची वेळ आता आली आहे, कारण लैंगिक स्वातंत्र्यावर निर्बध घालण्याचा एकमेव विवेकी आधार कौटुंबिक जीवनात आढळतो. कामवासना आणि पाप यांच्यावरील दीर्घ चर्चा आता …

विवाह आणि नीती (भाग १३)

कुटुंब आणि वैयक्तिक मानसशास्त्र या प्रकरणात मी व्यक्तीच्या शीलावर (character) कौटुंबिक संबंधांचा काय परिणाम होतो याचा विचार करणार आहे. या विषयाचे तीन स्वाभाविक भाग पडतातः मुलांवर होणारे परिणाम, मातेवर होणारे परिणाम, आणि पित्यावर होणारे परिणाम. हे तीन परिणाम वेगळे करणे अर्थातच कठीण आहे, कारण कुटुंब हे एक सुसंहत एकक (closely – knit unit) असते, आणि …

विवाह आणि नीती (भाग १४)

कुटुंब आणि शासनसंस्था जारी कुटुंबाची मुळे जीवशास्त्रीय असली तरी नागरित (civilised) समाजांमधील कुटुंब ही कायद्याने निर्मित अशी गोष्ट आहे. विवाहावर कायद्याचे नियंत्रण असते. आणि मातापित्यांचे अपत्यांवरील अधिकार अतिशय बारकाव्याने निश्चित केलेले असतात. विवाह झालेला नसेल तर पित्याला कुटुंबात कसलाही हक्क नसतो, आणि अपत्यावर एकट्या मातेचा अधिकार चालतो. परंतु जरी कायद्याचा उद्देश कुटुंबाचे रक्षण करणे हा …

विवाह आणि नीती (भाग १५)

घटस्फोट बहुतेक सर्व देशांत आणि बहुतेक सर्व युगांत घटस्फोटाला काही कारणांकरिता संमती होती. घटस्फोटाची संकल्पना एकपतिक-एकपत्नीक (monogamous) कुटुंबाचा पर्याय म्हणून कधीच केली गेली नाही. त्याचा उद्देश जिथे विवाहितावस्था कायम ठेवणे असह्य झाले असे वाटते तिथे क्लेश कमी करणे हाच राहिला आहे. या विषयातील कायदा भिन्न देशांत आणि भिन्न काळी अतिशय भिन्न राहिलेला आहे. आजही एकट्या …

विवाह आणि नीती (भाग १६)

लोकसंख्या ‘विवाहाचे प्रमुख प्रयोजन म्हणजे पृथ्वीवरली मानवाची संख्या भरून काढणे, काही विवाहव्यवस्थांत हे प्रयोजन अपुऱ्या प्रमाणात साधले जाते, तर काही जास्तच प्रमाणात ते पुरे करतात. या प्रकरणात मी लैंगिक नीतीचा विचार या दृष्टिकोणातून करणार आहे. व नैसर्गिक अवस्थेत मोठ्या सस्तन प्राण्यांना जिवंत राहण्याकरिता दरडोई बराच मोठा भूभाग लागतो. त्यामुळे मोठ्या सस्तन प्राण्यांच्या कोणत्याही जातीत प्राणिसंख्या …

विवाह आणि नीती (भाग १७)

‘कामप्रेरणा आणि व्यक्तीचे हित’ या प्रकरणात कामप्रेरणा आणि लैंगिक नीती यांच्या व्यक्तीचे हित आणि सुख यावर होणाऱ्या परिणामांविषयी यापूर्वीच्या प्रकरणांत जे लिहिले आहे त्याचा संक्षिप्त आढावा घेण्याचा विचार आहे. या ठिकाणी मानवी जीवनाचा कामप्रेरणा प्रबळ असण्याचा काळ किंवा प्रत्यक्ष लैंगिक संबंध यांच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. लैंगिक नीतीचे बाल्य, कुमारावस्था(adolesence), आणि वार्धक्यही यांवर विविध प्रकारांनी परिणाम होत …

विवाह आणि नीती (भाग १८)

मानवी मूल्यांत कामप्रेरणेचे स्थान कामप्रेरणेविषयी लिहिणार्‍या लेखकांवर, या विषयाची वाच्यता करू नये असे मानणार्‍या लोकांकडून, त्याला ह्या विषयाचा ध्यास लागलेला आहे असा आरोप होण्याची भीती नेहमीच असते. या विषयात त्याला वाटणारा रस त्याच्या महत्त्वाच्या तुलनेत प्रमाणाबाहेर असल्यावाचून फाजील सोवळया लोकांकडून होणारी टीका तो आपल्यावर ओढवून घेणार नाही असे मानले जाते. परंतु ही भूमिका रूढ नीतीत …

विवाह आणि नीती (भाग १९)

आपल्या चर्चेतून आपण काही निष्कर्षाप्रत आलो आहोत. यांपैकी काही निष्कर्ष ऐतिहासिक आहेत, तर काही नैतिक आहेत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता आपल्याला असे आढळले की आज नागरित समाजात लैंगिक नीती ज्या स्वरूपात आहे, ते स्वरूप तिला दोन भिन्न स्रोतांमधून प्राप्त झाले आहे. एका बाजूला पितृत्व निश्चित करण्याची पुरुषांची इच्छा, आणि दुसर्‍या बाजूला प्रजननाखेरीज अन्यत्र लैंगिक संबंध पापमय …