पत्रप्रेषक - लेख सूची

पत्रसंवाद

उत्पल वनिता बाबूराव आजचा सुधारकच्या मे अंकातील बाईमाणूस ह्या पुस्तकावरील लेख वाचला. लेखातील मुद्दे पटले. त्यांनी परखड परीक्षण केले आहे. (मी पुस्तक वाचलेले नाही) काही मुद्द्यांबाबत चर्चा होऊ शकेल असे वाटते. काही मुद्दे नव्याने समोर आले आहेत. भारतात तरी वर्ग-वर्णाच्या पलीकडे जाऊन स्त्रियांना एक होऊन समष्टिरूप धारण करता आलेले नाही. हो. हा मुद्दा इथल्या बऱ्याच …

पत्रसंवाद

अॅड. अतुल सोनक, दिवाकर मोहनी यांचा ‘जातिभेद आणि निवडणूक’ हा लेख वाचला. त्यांनी सुचवलेल्या निवडणूकपद्धतीसाठी घटनेतील आणि निवडणूक कायद्यातील अनेक कलमे बदलवावी लागतील. असे होण्याची मुळीच शक्यता नाही. त्यांच्या लेखातील इतर अनेक बाबींवरील आक्षेप न नोंदवता सरळ निवडणूक प्रक्रियेत त्यांनी सुचवलेल्या दुरुस्त्या अंमलात का येऊ शकणार नाहीत याबद्दल मला काय वाटते ते इथे नोंदवतो. समजा …

पत्रसंवाद

पण जर स्त्रीने स्वःतःला मोकळे सोडलेच नाही, तर ती कोठवर जाऊ शकते हे तिला कसे कळेल ? जर तिने आपल्या पायातले उंच टाचांचे बूट काढले नाहीत तर ती कोठवर चालू शकते किंवा किती जोरात पळू शकते, हे तिला कसे बरे कळणार ? मरणाला टेकलेले सर्व समाज पुरुषी आहेत. केवळ एक पुरुष असणारा समाज जगू शकतो, …

पत्रसंवाद

धनंजय मुळी, बी-१, विशभारती सोसायटी, प्लॉट नं.आर.एम.-३७, संभाजीनगर, एमआयडीसी, चिंचवड, पुणे ४११०१९. किशोर देशपांडे यांची एप्रिल २०१३ ते नोव्हेंबर २०१३ या कालावधीत आसु मध्ये प्रकाशित झालेली अनवरत भंडळ ही मालिका वाचली. ती वाचल्यानंतर तिच्यात जीवशास्त्रीय उत्क्रांतीबद्दल अनेक चुकीची किंवा दिशाभूल करणारी विधाने आढळून आली. तसेच त्यांच्या लेखां ध्ये विज्ञानाचे सार्वत्रिक स्वरूप पुरेशा स्पष्टतेने पुढे आलेले …

पत्रसंवाद

तारक काटे, धरामित्र, वर्धा [आजचा सुधारक च्या जुलै २०१३ (२४-०५) च्या अंकात ‘बीज स्वायत्ततेकडून गुलामगिरीकडे – बीजसंवर्धनाचे महत्त्व’ हा तारक काटे ह्यांचा लेख प्रकाशित झाला होता. त्यामध्ये त्यांनी प्राचीन भारतीय शेतीची बलस्थाने काय होती. त्यानंतर आलेले संकरित बियाणे व त्यानंतर जनुकीय बदलांद्वारे निर्माण करण्यात आलेले बियाणे ह्या दोन गोष्टींमुळे शेतीव्यवस्थेत काय परिवर्तन झाले व त्या …

पत्रसंवाद

ऑक्टोबर ०९ च्या अंकातील, देवेन्द्र इंगळे यांच्या लेखावर प्रतिक्रिया – भावनांना हात घालणारे आणि प्रचारकी थाटाचे लिखाण आ.सु.ने प्रसिद्ध करणे चूक आहे. आपल्या मूळ हेतूपासून सुधारक दूर जाऊ नये अशी माझी इच्छा आहे. इंगळे यांच्या लेखातील आक्षेपार्ह वाक्ये (गडद ठशामधील) आणि त्यांवरील आक्षेप पुढीलप्रमाणे आहेत. जीवसृष्टीच्या उत्क्रांतीचा डार्विनप्रणीत सिद्धान्त त्यावेळच्या सर्वच ईश्वरवादी धर्मपंथासाठी आह्वानास्पद ठरला. …

पत्रसंवाद

तुमचा नागरीकरणावरील विशेषांक वाचला. काही लेख उदा. बोंगिरवार, सुजाता खांडेकर, विद्याधर फाटक असेही इतर-नागरीकरणाच्या प्रश्नाला हात घालतात आणि वाचून समाधान होते. पण विशेषतः संपादकीयातील जेन जेकब्ज, एबेक्झर हॉवर्ड, फ्रँक लॉइड राईट, जुवाल पोर्तुगाली वगैरे उल्लेख हे पानभरू वाटतात. गरीब देशातील नागरीकरणाकडे जमिनीवर उभे राहून पहाणारे वाटत नाहीत. अशा उल्लेखांचा उपयोग दागिन्यांसारखा वाटतो. दागिन्यांना स्थान नक्कीच …

पत्रसंवाद

जॉर्ज ऑरवेलची नॅशनॅलिझमवरची टीका ही समूहवादाला उद्देशून होती, राष्ट्रवादाला नव्हे हे मी सप्टें. ०४ च्या अंकातील पत्रात स्पष्ट केले होते. तशीच चूक मीरा नंदा ह्यांच्या ‘आधुनिकोत्तरवाद’ ह्या लेखात दिसते. भारतात इ.स. १३०० पासून मुस्लिमांनी जिहादच्या नावाने प्रचंड कत्तली घडवून आणल्या आहेत. ह्याची प्रतिक्रिया म्हणून शिवाजीच्या वेळेपासून हिंदू समाजाचे संघटित होण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच परिणाम …

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक, यांस, जुलै १९९७ च्या आजचा सुधारक च्या अंकात ‘वैज्ञानिक रीत’ हा डॉ.र. वि. पंडित यांचा लेख वाचण्यात आला. या लेखात डॉ. पंडित यांनी विश्वाबद्दलची त्यांची धारणा मांडताना काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांविषयी थोडेसे. र. वि. पंडित ह्यांचे ‘विश्व बहुतांशी खगोलशास्त्रज्ञांना आज तरी तत्त्वतः मान्य नाही. आजमितीस विश्वाची उत्पत्ती ही एका प्रचंड …

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक, जाने. ९७ चा अंक मिळाला. इंदुमती यार्दी ह्यांचे विचार योग्य असले तरी त्यांनी दिलेले गिलचे उदाहरण चूक आहे. एक ओली पार्टी होती. अशा पार्टीला बजाज ह्यांनी जावयासच नको होते. दारू प्यालेल्या गिलने त्यांना जवळ बोलाविल्यावर त्या गिलजवळ गेल्या व गिलने चापट मारली. बजाजांनी गिलजवळ जावयाचे नाही. आम्ही पुरुषसुद्धा रस्त्यात दारू प्यालेला कोणी …

पत्रव्यवहार

प्रा. काशीकर ज्या स्टीफन हॉकिंगचे संदर्भ देतात त्या (आजचा सुधारक, मे-जून ९२) प्रोफेसर हॉकिंग यांचेबद्दल थोडी अधिक माहिती वाचकांना नसल्यास करून द्यावीशी वाटते. डॉ. स्टीफन हॉकिंग (वय वर्षे ५०) हे केंब्रिज विद्यापीठात थिऑरेटिकल फिजिक्सचे प्राध्यापक आहेत. त्यांचे शिक्षण ऑक्सफर्ड व नंतर केंब्रिज विद्यापीठात झाले व वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी १९६६ मध्ये “Universe could have …

पत्रव्यवहार

प्रिय श्री. वि. रा. लिमये यांस स.न.वि.वि. आपण पाठविलेले कार्ड व पत्र मिळाले. आभारी आहे. ‘आजचा सुधारक’चा फेब्रुवारी १९९२ चा अंक मिळाला. संपूर्ण अंक वाचला. मी लेखकाच्या मताशी सहमत नाही, कारण लेखक हा पुरुष असल्यामुळे त्याच्या दृष्टिकोनातून तो विचार करतो. कोणतीही स्त्री लेखकाचे मत मान्य करणार नाही. संकोचामुळे तसे ती कदाचित व्यक्त करणार नाही. स्त्री-पुरुषांत …

पत्रव्यवहार

तात्पर्य सांगताना ते म्हणतातः …. तात्पर्य, व्यक्ती व समूह-जीवनाची अमुक अमुक अंगे ही राज्यसत्तेच्या नियंत्रणाखालीच असणे योग्य व वैध आहे. राज्यसत्ता धर्मपीठाच्यापेक्षा उच्चतर अशी सार्वभौम सत्ता आहे याला मान्यता मिळाली. गाभ्याचा मुद्दा सार्वभौमत्व व अंतिमतः नियंत्रण व अधिकार कोणाचा हा होता. ‘धर्माचा आधार समाजव्यवहारांना असावा की नसावा हा मुद्दा नव्हता. हाच पळशीकरांचा पायाभूत घोटाळा! युरोपमध्ये …

पत्रसंवाद

संपादक, आजचा सुधारक यांस. आपण गीतेतील चातुर्वर्ण्य जन्माधारितच होते असे प्रतिपादन ‘आजचा सुधारक मधील विवेकवाद या लेखमालेतून केले आहे. (अशाच प्रकारचे प्रतिपादन मीही माझ्या ‘विषमतेचा पुरस्कर्ता मनू’ या पुस्तकाच्या भूमिकेत १९८३ मध्ये केले होते.) आपल्या या प्रतिपादनावर ‘आजचा सुधारक’च्या ताज्या अंकात सुधाकर देशपांडे यांची प्रतिक्रिया आली आहे. तथापि आपलीच भूमिका मला का पटते यासाठी समर्थनाचे …

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक, यांस आपली विवेकवाद ही लेखमाला खूप उरोधक आहे. परंतु कधी कधी मला असे वाटते की, आपले निष्कर्ष आधीच ठरलेले असून त्यांच्या पुष्टीसाठी आधारविधाने शक्य त्या मागांनी शोधण्याचे काम आपण करीत आहात. सत्यशोधक शंभर टक्के नि:पक्षपाती नाही असा थोडासा जरी संशय वाचकाला आला तरी वाचक-लेखकसंवादात व्यत्यय येऊ शकतो. असा संशय हेच माझ्या पत्राचे …

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक’ यांस जून १९९१ च्या अंकात श्री. दिवाकर मोहनी यांचा ‘धर्म, धर्मनिरपेक्षता आणि त्यातून उद्भवणारे काही प्रश्न हा विस्तृत लेख आपण प्रसिद्ध केला आहे. त्या लेखाच्या संदर्भातील काही विचार. श्री. दिवाकर मोहनी आणि तत्सम विचारवंत धर्म, धर्मनिरपेक्षता. सर्वधर्मसमभाव, राष्ट्रीय एकात्मता, इत्यादी संकल्पना, त्यांचा सामाजिक व राष्ट्रीय जीवनातील आविष्कार यांचा विचार तात्त्विक पातळीवरून करतात …

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक, स, न. वि. वि. फेब्रुवारी १९९१ च्या अंकात आपण वसंत कानेटकरांचे पत्र छापले आहे. पुण्यात झालेल्या स्त्रीवादी समीक्षेवरील परिसंवादाचे वेळी घडलेल्या एका घटनेचा त्यात उल्लेख आहे. त्या परिसंवादात मी सहभागी होतो. ‘परमिसिव सोसायटी’ची भलावण केल्याबद्दल प्रा. के. ज. पुरोहित यांचा निषेध परिसंवादात सहभागी झालेल्या काही स्त्री-पुरुषांनी केला ही वस्तुस्थिती नाही. घडले ते …

पत्रव्यवहार

संपादक, नवा सुधारक’ यांस, नोव्हेंबरच्या अंकातील औरंगाबादचे प्रा. श्याम कुलकर्णी यांचं पत्र आणि त्या पत्राला तुम्ही दिलेलं ‘काहीसं सविस्तर उत्तर दोन्ही वाचली. ती वाचल्यानंतर न तथा आंदोलिकादंडः यथा ‘बाधति बाधते अशी माझी अवस्था झाली. मी काही कुणी प्रोफेसर नाही. विज्ञानाचाही नाही किंवा तुमच्या त्या तत्त्वज्ञानाचाही नाही. पण तरीसुद्धा माझ्या अल्पमतीला असं वाटतं की तुम्ही एक …

पत्रव्यवहार

संपादक, नवा सुधारक स.न.वि.वि. नवा सुधारकच्या नोव्हे. ९० अंकातील साथी पन्नालाल सुराणा यांचे पत्र वाचले. त्यांचा आक्षेप मुख्यतः माझ्या लेखातील (नवा सुधारक, ऑक्टो. ९०) प्र.१८ वरील दुसर्‍या परिच्छेदाच्या संदर्भात आहे. त्यातील मांडणी जास्त काटेकोरपणे व संयमाने होणे गरजेचे होते. सर्वश्री ना.ग. गोरे, मधु लिमये व मृणाल गोरे यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. तत्त्वासाठी त्यांनी किंमत …

प्रा. वसंत कानेटकर यांच्या पत्राच्या निमित्ताने

प्रा. वसन्त कानेटकर ह्यांच्या ‘नवा सुधारक’ च्या ऑगस्ट-अंकात प्रकाशित झालेल्या पत्रातील पुर्वाधांच्या संदर्भात (स्त्री – पुरुषांनी आपापांतील मत्सरभाव सहजात आहे, की अर्जित) निरनिराळ्या मानवशास्त्रज्ञांनी केलेल्या अध्ययनाचे काही अंश पुढे दिले आहेत. असेच आणखीही काही उतारे पुढे देण्याचा विचार आहे. भिन्नभिन्न ठिकाणी आढळणाच्या विवाहसंरधनील वैविध्याकडे केवळ वैचित्र्य म्हणून पाहण्यात येऊ नये. आपल्या जीवनातील समस्या सोडविण्यासाय ह्या …

पत्रव्यवहार

संपादक ‘नवा सुधारक’ यांस, आपण म्हणता त्याप्रमाणे, व आगरकरही म्हणतात त्याप्रमाणे, विश्वासावलंबी कल्पनांची जागा विवेकवादाने घेणे इष्ट आहे हे उघडच; पण सर्वसाधारण माणसास विवेकवाद हे आपल्या अपकृत्यांचे समर्थन करण्याचा मार्ग वाटू नये. मी खून केला तर मला त्याचे प्रायश्चित्त मिळेल ही भावना माणसास खून न करण्यास प्रवृत्त करते. विवेकवादाने जर खून करणार्‍यांपैकी ९०% लोक पुराव्याअभावी …

पत्रव्यवहार

ऑगस्ट ९० च्या अंकातील ‘धर्म की धर्मापलीकडे’ हा लेख वाचला. धर्म हा भीतीवर आधारित आहे असे लेखकाने म्हटले आहे. ‘सृष्टीच्या खर्‍याखुर्‍या ज्ञानाने भीतीचा समूळ नाश होणार आहे हे सर्वसामान्य लोकांना पटवून द्यावे लागेल’ असे विधान लेखकाने केले आहे. या विधानाला सबळ पुरावा लेखकाने लेखात कोठेही दिलेला नाही. हे विधान वस्तुस्थितीला धरून आहे असे वाटत नाही. …

पत्रव्यवहार

[ पुढे दिलेले पत्र आम्ही छापणार नव्हतो. ते क्रोधाच्या भरात लिहिलेले असून त्यातील भाषा असभ्य आणि अभिरुचीहीन आहे, आणि ते वाचून आमच्या वाचकांना क्लेशच होतील याची जाणीव आम्हाला आहे. त्या पत्रात फक्त शिवीगाळ आहे, युक्तिवादाचा मागमूस नाही हे वाचकांच्या लक्षात येईलच. पण तरीसुद्धा ते पत्र छापायचे आम्ही ठरविले यांची दोन कारणे आहेत. एकतर तुम्ही हे …

पत्रव्यवहार

संपादक, नवा सुधारक यांस स. न. वि.वि ‘नवा सुधारक’ (जून) मिळाला. तुम्ही दर महिन्याला वैचारिक खाद्य चांगले पुरवताहात याबद्दल धन्यवाद. रसेलची (विवाह आणि नीती) ही अनुवादित लेखमाला व श्रीमती पांढरीपांडे यांचा स्त्री दास्य याबद्दलचा लेख विचारप्रवर्तक आहेत. त्या अनुषंगाने मला दोन प्रश्न उपस्थित करायचे आहे. त्याबद्दल ‘ तयार उत्तरे’ नको आहेत. पण विचारमंथन हवे आहे. …

वाचकांच्या निवडक प्रतिक्रिया

वा. वि. भट संपादक ‘संग्रहालय’ अभिनव प्रकाशन अंक मिळाला. लगेच वाचूनही काढला. त्यातील मनुताईंच्या परिचयाचा श्री. कुळकर्णी यांनी लिहिलेला लेख खूप आवडला. डॉ. भोळे यांचा सोव्हिएट रशिया व पूर्व युरोपातील घडामोडी संबंधीचा लेखही विचार प्रवर्तक आहे. श्री. दिवाकर मोहनी यांचे पत्र अत्यंत मार्मिक वाटले. श्रीमती दुर्गा भागवत अंक वाचनीय व उद्बोधकही आहे. बरट्रॅंड रसेल रसेलच्या …

पत्रव्यवहार

श्री दिवाकर मोहनींचे पत्रांना उत्तर संपादक, नवा सुधारक यांस, सप्रेम नमस्कार आपल्या ३ मे च्या अंकात माझ्या पत्राला उत्तरादाखल आलेली तीन पत्रे प्रकाशित झाली आहेत. डॉ. न. ब. पाटील, प्रा. म. ना. लोही, प्राचार्य ना. वि. करबेलकर, श्री. राम वैद्य आणि डॉ. विजय काकडे आदींनी मोठी पत्रोत्तरे पाठविली आहेत. त्याशिवाय श्री. वसंत कानेटकर, श्री. यदुनाथ …

पत्रव्यवहार

श्री. मोहनींच्या पत्रावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याची इच्छा आहे. ‘हिंदू असणे’ आणि ‘धार्मिक’ असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. खुद्द शंकराचार्यांनाही ‘प्रच्छन्न बौद्ध’ म्हटले गेले. (बुद्ध हा तर’ निरीश्वरवादी’आणि ‘आत्मा’ न मानणारा होता.) तरीही ते ‘हिंदू’च होते. ही सहिष्णुता हिंदुधर्मीयांशिवाय अन्यत्र कोठे दिसते? ‘हिंदू-मुसलमानांचे दंगे’ आणि ‘धर्म – त्यांतही वैदिक धर्म आणि विज्ञान’ यांतील वाद या …

पत्रव्यवहार

समस्या हिंदुत्वाची – श्री. दिवाकर मोहनींना उत्तर श्री. दिवाकर मोहनींनी ‘नवा सुधारक’च्या पहिल्या अंकात मुख्य दोन प्रश्न उपस्थित केले आहेत :- (१) हिंदू म्हणून करावयाची कर्तव्ये कोणती? आणि (२) ती न करताही एखाद्याला हिंदू म्हणवून घेता येईल काय? यांपैकी पहिल्या प्रश्नाचे उत्तर निश्चित ठरले तर दुसरा प्रश्न निकालात निघतो. कारण एखाद्याने ती किमान कर्तव्ये पार …

पत्रव्यवहार

श्री. संपादक नवा सुधारक यांस स. न. वि. वि. पुष्कळ दिवसांपासून माझ्या मनात एक प्रश्न घोळत आहे. त्याबाबतीत आपले मार्गदर्शन मिळावे ही विनंती. आपणांस इष्ट वाटेल तर ह्या प्रश्नांची आपण आपल्या नवीन मासिकातून प्रकट चर्चा करावी. त्यामुळे कदाचित इतर जिज्ञासूंनासुद्धा लाभ होईल. प्रश्न हिन्दू म्हणून माझी कर्तव्ये काय असा आहे. मी जन्मतः वा परंपरेने हिन्दू …