प्रमोद सहस्रबुद्धे - लेख सूची

कुचंबणा होत असेल तर त्यातून बाहेर काढणे हे उद्दिष्ट

आपल्या ब्राईट्स संस्थेच्या उद्दिष्टांचा जो छापील, कायदेशीर असा एक कागद माझ्याकडे आहे, त्याच्यात साधारण दहा बारा उद्दिष्टं लिहिलेली आहेत. त्यातलं एक मुख्य उद्दिष्ट आहे की, आपण ज्या समाजात राहतो तिथे काहीतरी लोकशिक्षण आपण केलं पाहिजे. २०१३ साली डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून झाला त्यावेळेला विचारांची जी एक घुसळण झाली त्या घुसळणीतून ब्राईट्स संस्थेची स्थापना झाली. आज …

प्रमोद सहस्रबुद्धे ह्यांचे भाषण

माझ्यावर मुख्य दोन जबाबदाऱ्या आहेत. एक म्हणजे आभार मानायचे. पण मी सुरुवातीला आजच्या सत्राबद्दल बोलणार आहे. शिवाय संघटनेला कशाची गरज आहे आणि तुम्ही त्यासाठी काय करू शकता, हेही सांगणार आहे. तर आजचं सत्र मी खरोखर एन्जॉय केलं. मला वाटलं नव्हतं की या बाजूने एन्जॉय करणं मला कधी जमेल! पण खाली बसून एन्जॉय करण्यासारखंच हे सत्र …

नीतीचे मूळ

नीतीचे मूळ हे कुठल्याही गृहीतकाशिवाय सिद्ध करता येते असे माझे मत आहे. हा अर्थात तत्त्वज्ञानातील एक महत्त्वाचा विषय. पूर्वी यास ईश्वरी वा पारलौकिक गृहीतकांचा आधार लागतो असे कित्येकांना वाटायचे. पण हळूहळू तसा आधार न घेता नीतिनियमांची मांडणी करता येणे कसे शक्य आहे यावर विचार सुरू झाला. यावर ‘आजचा सुधारका’त अतिशय उत्तम लेखमाला प्रकाशित झाली होती. …

जुने वैज्ञानिक सिद्धांत आणि मिथके

जुन्या सिद्धांताऐवजी अधिक व्यापक आणि अधिक अचूक असे नवे सिद्धांत येत जाणे ही विज्ञानाची रीत आहे. यातील जुन्या सिद्धांतांची कधी कधी चांगल्यापैकी हेटाळणी झालेली पाहण्यात येते. म्हणजे पृथ्वी जगाच्या केंद्रस्थानी आहे हा सिद्धांत हेटाळणीस प्राप्त झालेला दिसतो. गॅलिलिओने जे दुर्बिणीतून पहिले ते कुणीही पाहिले तर ताबडतोब पृथ्वी केंद्रस्थानी हे मान्य केले जाईल असे बऱ्याच जणांना …

ज्योतिषशास्त्राबद्दल थोडे

IGNOU चे हिंदीतील MA (ज्योतिष) आणि त्यासंबंधीच्या प्रतिक्रिया असे म्हणतात की भारतीय भविष्य (ज्योतिष) व्यवसाय हा ७०००० कोटींचा आहे. (https://www.exchange4media.com/marketing-news/shemaroo-enters-astrology-market-with-50-stake-in-dominiche-productions-96104.html) म्हणजे साधारण २० लाख ज्योतिषी. माझ्या मते हा आकडा अतिशयोक्त आहे. ज्योतिषी संघ असतात, त्यांच्या सभासदांची संख्या बघून नीट अंदाज बांधता येईल. कदाचित या आकड्यात प्रसिद्धीमाध्यमांचा समावेश असावा. त्यामुळे पुस्तके, वर्तमानपत्रे, चित्रवाहिन्या यांतील पैसा (त्याप्रमाणात) त्यात धरला गेला …

बुद्धिप्रामाण्यवादातील सार्वत्रिकांचा प्रश्न

आम्हां नास्तिक मित्रांचा एक छोटासा गट आहे. या गटात चर्चा करताना, आम्ही काही महत्त्वाचे नियम पाळतो ते असे. चर्चेचा विषय ठरल्यावर विषयबाह्य लिहायचे नाही, चर्चा करताना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. ‘मला माहीत नाही’, असे उत्तर दिले तरी चालते पण ते द्यायचे. अशा नियमबद्ध चर्चेचा प्रत्येकाला चांगला फायदा होतो. एक तर प्रश्नांच्या खाचाखोचा कळतात. आणि दुसरे म्हणजे …

विचार तर कराल

डॉ.नरेंद्र दाभोलकरांचा आणि माझा परिचय साधारणपणे १९९४-९५ च्या दरम्यान झाला. आम्ही सारे त्यांना डॉ. दाभोलकर वा नुसते डॉक्टर म्हणत असू पण त्यांच्या पुस्तकांवर दाभोलकर असे लिहिले जाते. त्यावेळी वास्तुशास्त्रावर दादरला एक सभा होती. एक वास्तुशास्त्रावर बोलणारे वकील, एक प्रतिवाद करणारे आर्किटेक्ट, दाभोलकर आणि अध्यक्ष एक निवृत्त न्यायमूर्ती अशी ती सभा होती. दाभोलकरांचे भाषण विनोदी आणि …

जगविस्तीर्ण मन : मानवता, यंत्र आणि आंतरजाल एकत्रित करणारे

World Wide Mind : The coming integration of humanity, machines and the internet लेखक मायकेल कोरोस्ट (प्रकाशक फ्री प्रेस, 2011) हे पुस्तक हल्ली वाचले. मेंदूतील प्रक्रियांचा शोध आणि त्याचा होऊ घातलेला परिणाम या विषयावर हे पुस्तक आहे. गेल्या वर्षी, ‘आता यंत्रे मन ओळखू शकणार’ अशी बातमी वृत्तपत्रांतून आली होती. काही वृत्तपत्रीय अग्रलेखही त्यावर आले होते. …

संपादकीय

बरेचदा विवेकवादी माणसाला जागोजाग पसलेल्या अंधश्रद्धेचा प्रश्न बिनमहत्त्वाचा वाटतो. याचे कारण अंधश्रद्धेचे मूळ भोळसरवृत्ती हे आहे. जगातल्या अंधश्रद्धा एके दिवशी संपल्या तरी भोळेपणा चालूच असल्याकारणाने नव्या अंधश्रद्धा निर्माण होतील. शिवाय जुन्या व नव्या अंधश्रद्धांमध्ये समाजहितास घातक असण्याच्या बाबतीत डावे उजवे करता येणार नाही. मग अंधश्रद्धांचा प्रश्न गैरमहत्त्वाचा ठरतो. अंधश्रद्धांचे मूळ बरेचदा भोळेपणात असले तरी त्यांचा …

अंधश्रद्धाः काही संकल्पना

आपण अंधश्रद्ध आहोत हे जवळपास कोणीच पटकन म्हणणार नाही. जरा खोलवर विचार केल्यावर कदाचित एक दोन बाबी मान्य केल्या जातील पण त्या तेवढ्याच. सर्वसाधारण अंधश्रद्धा म्हणजे दुसऱ्या कुणाची विचित्र समजूत असे म्हटले तर फारसे वावगे ठरू नये. या सापेक्ष व्याख्येचा एक फायदा म्हणजे अंधश्रद्धेविरुद्ध सर्वांचे एकमत होऊ शकते! कारण दुसऱ्यांची अंधश्रद्धा दूर करणे हे प्रत्येकाचे …

धार्मिक अंधश्रद्धा धर्मः

अंधश्रद्धांचा एक मोठा स्रोत म्हणून धर्माकडे पाहता येते. बहुतांश अंधश्रद्धांचा धर्माशी संबंध दिसतो. धर्माचे वा धार्मिक अंधश्रद्धांचे तीन भाग करता येतात. परंपरागत, वैयक्तिक व संघटनात्मक असे ते तीन भाग करता येतील. प्रत्येक धर्माला मूलतत्त्व असते (जे विविध पंथांमध्ये समान असते पण दोन धर्मांत असमान असते). एक ज्ञानी वा पुरोहितवर्ग असतो आणि एक सामाजिक अस्तित्व असते. …

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळींचा वेध

भाग तीनः कार्यकर्ते : व्यक्ती व संघटना १९६७ ते १९८० दरम्यान आर्थिक, राजकीय घडामोडींना वेग आला होता. तरुणांची आंदोलने होत होती. नक्षलवादी चळवळीचा उगम, बिहार व गुजरातमधील आंदोलने याच काळातली. महाराष्ट्रात अशा अस्वस्थतेबरोबर, तरुण दलितांची चळवळ दलित पँथर, सामाजिक बदलाची चळवळ युक्रांद यांचे वारे वाहत होते. १९७४ मध्ये वरळीत दलित-सवर्ण दंगा झाला, यापुढे काहीच महिन्यांत …

भाग चारः सर्वेक्षण श्रद्धांचे सर्वेक्षण

सध्या खूप मोठ्या प्रमाणात लोक श्रद्धाळू झाले आहेत असे म्हणणारे विवेकी, तर लोकांना कसची चाड राहिली नाही असे म्हणणारे धार्मिक आपल्याला भेटत असतात. ही त्यांची मते दिखाऊ श्रद्धा वा अश्रद्धा जाणवल्यावर प्रगट होत असतात. म्हणजे अमक्या मेळ्याला काही लाख माणसे जमली, मोठा अपघात झाला त्यात सर्व यात्रेकरू होते, असे काहीसे ऐकू आले की विवेकी माणसांना …

पत्रसंवाद

टी.बी. खिलारे यांनी चर्चेला दिलेले उत्तर काही बाबतीत चांगले व पटणारे आहे. पण तीन बाबतीत ते पटणारे नाही, तिथे त्यांचा युक्तिवाद तोकडा आहे. दि. य. देशपांडे आ.सु.चे संपादक असताना कित्येक विषयांवर मनमोकळ्या चर्चा झाल्या होत्या. विरोधकांची ग्राम्य भाषेकडे झुकणारी पत्रेही त्यांनी छापली होती. ‘आम्ही श्रद्धेची चिलखते काढून टाकली आहेत, त्यामुळे आम्हाला कुठलाही बाण वर्ण्य नाही’ …

विसर्जित गणपती दान करा!

लोकांनी नैसर्गिक पाण्याच्या स्रोतात गणेशविसर्जन न करता त्या मूर्ती लाक्षणिक विसर्जन करून दान द्याव्यात हा या चळवळीचा मुख्य उद्देश आहे. या दान दिलेल्या मूर्तीचे निर्गत मग अन्य ठिकाणी पर्यावरणाला विशेष हानी न पोचविता केले जाते. पूर्णतः धार्मिक अंगाने विचार केला तर गणपतिविसर्जन हा भाग परंपरेचा अधिक आहे. प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी व सांगता पूजा केल्यानंतर गणपतीच्या मूर्तीत …

स्वातंत्र्योत्तर भारतीय विज्ञानाचे यशापयश (3)

वैज्ञानिक नीती गेल्या वर्षात उत्तरांचल विश्वविद्यालयाचे कुलगुरू राजपूत यांचे नाव चर्चेत होते. पदार्थविज्ञान या विषयातील त्यांचे संशोधन वादग्रस्त ठरले होते. दुसऱ्याचे संशोधन स्वतःच्या नावावर त्यांनी खपवले होते. हे त्यांनी एकदा नाही तर अनेकदा केले होते. त्यांचे एकंदर संशोधन याच प्रकारचे होते असेही मत यावेळी आले होते. हे गृहस्थ स्वतःस उच्च कोटीचे वैज्ञानिक मानत व आपल्या …

स्वातंत्र्योत्तर भारतीय विज्ञानाचे यशापयश (भाग २)

विज्ञानाची सद्य:परिस्थिती: विज्ञानविश्वातील परिस्थिती गेल्या पन्नास वर्षांत झपाट्याने बदलली. पूर्वीचे वैज्ञानिक बरेचदा स्वतःच साधनसामुग्री जमवून संशोधन करीत असत. संशोधनातला त्यांचा रस त्यांना तसे करण्यास उद्युक्त करी. सी. व्ही. रमण, भाभा (सुरवातीच्या काळात) हे याच पठडीतील संशोधक, गेल्या पन्नास वर्षांत संशोधन हे मोठ्या प्रमाणावर संस्थांच्या माध्यमांतून सुरू झाले. त्यामुळे संशोधनातील संघटन वाढले. काय करायचे, कधी करायचे …

स्वातंत्र्योत्तर भारतीय विज्ञानाचे यशापयश (भाग १)

विषयप्रवेश काळात भारताचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला. या विकासात विज्ञानाचा मोठा हातभार होता. आपण केलेला हा विकास पुरेसा झाला की नाही, आपल्या क्षमतेएवढा झाला की नाही, ज्या क्षेत्रात हवा त्या क्षेत्रात झाला की नाही, समाजातील निम्नस्तरांना फायदेशीर झाला की नाही, या प्र नांना होकारार्थी उत्तरे मिळतीलच असे नाही. पण विकास झालाच नाही असे कोणी म्हणू …

भारत, एक ‘उभरती’ सत्ता

स्टीफन कोहेन यांचे इंडिया, अॅन इमर्जिंग पॉवर हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. ‘११ सप्टेंबर’च्या आधी लिहिले गेल्यामुळे यात बदलत्या राजकीय समीकरणांचे उल्लेख नाहीत, पण भरपूर मेहेनत, संदर्भ, वेगळा दृष्टिकोन आणि मुख्य म्हणजे त्रयस्थ भाव यामुळे हा ग्रंथ उल्लेखनीय झाला आहे. कोहेन हे ‘भारतज्ञ’ म्हणून नावाजले गेले आहेत. त्यांनी पूर्वी ‘इंडिया, अॅन इमर्जिंग पावर?’ नावाचे पुस्तक …

मला सापडलेला कार्ल मार्क्स

कार्ल मार्क्स (१८१८ ते १८८३) या व्यक्तीबद्दल मला फारसे आकर्षण नव्हते. मार्क्सवाद व सोविएत रशिया याबद्दल मात्र तसे म्हणता येणार नाही. सर्वांनी वाचला तसा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो मी पूर्वीच वाचला होता व चांगला वाटला होता. मग मुळात वाचावे या जिद्दीने दास कॅपिटाल वाचायला घेतले, मात्र वाचू शकलो नाही. कारण ते पुस्तक मला बरेच कंटाळवाणे व पुनरुक्तीने …

भरवशाच्या म्हशीला . . . !

२३ जानेवारीला माझ्या भावाचे काही कागद घ्यायला आयायटीत (पवई) गेलो. ते तयार होत असताना समजले की एक तंत्रवैज्ञानिक उत्सव होणार होता. आयायटीच्या ‘मूड इंडिगो’ या उत्सवासारखाच हाही उत्सव विद्यार्थीच साजरा करतात. २६ ते २८ जानेवारीला उत्सव होता, आणि मला २७ ला त्या भागात काम होते. उत्सव पाहायचे ठरवले. हा उत्सव विद्यार्थ्यांसाठीच होता.. उद्योग आणि शिक्षकवर्गाचा …

लोकशाहीचा प्रश्न

राजकीय क्षेत्रात लोकशाही हे अंतिम मूल्य मानले जाते. ते खरोखच अंतिम मूल्य आहे का हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न. अर्थात् लोकशाही हे राजकीय मूल्य मांडण्यापूर्वी कुठची म्हणजे भारतातली, अमेरिकेतली का स्वित्झर्लडमधील लोकशाही हे ठरवणेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. आतापर्यंत बरेचसे आलबेल असताना म्हणजे लिंकन, स्झवेल्ट किंवा निक्सन वगैरेंचा काळ विसरून अमेरिकन लोकशाही ही आदर्श मानली जात …

अचमत्कारी साधु श्री. वामनराव पै (सद्गुरु, बी. ए. ऑनर्स, वगैरे)

चमत्कारी बाबा, महाराज, योगी वा तांत्रिक यांना विरोध करणे सोपे व सोयीचे आहे. या लोकांच्या खोटारडेपणास बेपर्वाई, शुद्ध बावळटपणा, वगैरेंची जोड मिळून त्यांना हातोहात पकडणे वा कुठल्याही कायद्याखाली डांबणे, या गोष्टी शक्य होतात. अर्थात, हे सर्व असूनदेखील हे महंत ठिकठिकाणी प्रकट होतच असतात व अनेक लोकांना फसवतच असतात. त्यांना जरब बसविणे हे त्यामुळेच महत्त्वाचे काम …

सर्वधर्मसमभाव म्हणजे घाबरगुंडी!

सर्वसाधारणपणे “धर्मनिरपेक्षता” म्हणजे राज्यसत्ता व धर्मसत्ता यांचा काडी-मोड. तसेच वैयक्तिक पातळीवर धर्मनिरपेक्षता म्हणजे नोकरी, धंदा, शैक्षणिक प्रवेश, प्रवास, इ. ‘न-धार्मिक’ क्रियांत धर्म विचारात न घेता वागणूक देणे वा घेणे. “सर्वधर्मसमभाव” हे मात्र मोठेच गौडबंगाल आहे. धार्मिक बाबतींत सर्व धर्म समानच असतात, त्यामुळे एकाने दुस-याला शिकवण्याचा शहाणपणा करू नये, असे काहीसे त्याचे रूप आहे. “आकाशात् पतितं …

पुस्तक परीक्षण- “हिंदु-मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद”

डॉ. रावसाहेब कसबे यांचे हे पुस्तक इतिहासातून आजच्या प्रश्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करते. आज झालेले धर्मशक्तींचे ध्रुवीकरण व त्यातही नवहिंदुत्ववाद्यांची वाढती आक्रमकता लेखकास पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त करते. अध्यात्माचे राजकारण’ वा राजकीय कारणांसाठी धर्माचा वापर करण्याची वृत्ती, याने लेखक अस्वस्थ झाला आहे. राजकीय हेतूसाठी अशा शक्तींनी केलेल्या बुद्धिभेदाला बळी पडलेल्या पुरोगामी वआंबेडकरवादी लोकांना जागे करणे हाही …

मनुस्मृती व विवेक

आपल्या चालीरीतींवरील मनुस्मृतींचा पगडा किंवा नामवंतांनी केलेला तिचा पुरस्कार पाहिल्यावर आपण मनुस्मृती वाचण्यास उद्युक्त होतो. वे.शा.सं. विष्णुशास्त्री बापट यांचे मनुस्मृतीचे संपूर्ण मराठी भाषांतर (प्रकाशक: रघुवंशी प्रकाशन, मुंबई) आपल्या तत्संबंधीच्या बहुतांश गरजा पूर्ण करते. चालीरीतींवर जसा परंपरागत संस्कारांचा प्रभाव असतो, तसाच तो त्याविषयी साकल्याने विचार करणाऱ्या सामाजिक नेतृत्वाचाही असतो. हे नेतृत्व जेव्हा, “हे सर्व समाजाच्या व …

प्रीतिवाद

मुख्य विषयाला हात घालण्याआधी विवेकवादातील एका मुद्द्याला हात घालतो. त्याची संगती नंतरच्या युक्तिवादात आहे. तेव्हा थोडे विषयांतर. व्याख्यात्मक विधाने व्याख्यात्मक विधाने ही स्वतःहून सत्य किंवा असत्य असत नाहीत. उदाहरणार्थ : “भ्र म्हणजे एक यंत्र की जे दूध व पाणी (मिसळलेले) दूर करते.” या व्याख्यारूपी विधानास स्वतःची अशी सत्यता नाही. या विधानावरून एकच बोध होतो की …